BJP President
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर देशात भाजपप्रणित एनडीएचे सरकारही सत्तेत आले आहे. त्यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाकडे लक्ष लागले आहे. भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जे. पी. नड्डा यांच्या पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यानुसार, आता नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार आहे. पण आता याच निवड प्रक्रियेला आणखी वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भाजप अध्यक्ष निवडीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही संभ्रमात झाल्यानंतर आता पक्षाला नव्या अध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि भाजपच्या संघटनेतील अस्वस्थ परिस्थितीनंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीमध्ये आरएसएसची भूमिका महत्त्वाची ठरण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, भाजपच्या नव्या संघातही बरेच बदल होऊ शकतात.
नव्या अध्यक्षांच्या नावावरून संघातही मोठी संभ्रमावस्था असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच भाजप अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो. कारण पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकाही लवकरच सुरू होणार आहेत. ज्या पूर्ण होण्यासाठी सुमारे सहा महिने लागतील.
…तोपर्यंत जे. पी. नड्डा राहणार अध्यक्ष
केंद्रीय संसदीय मंडळ तोपर्यंत नड्डा यांना अध्यक्षपदी ठेवू शकते आणि कार्यवाहक अध्यक्षांची करण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाकडेच पक्षाची कमान सोपवली जाण्याची शक्यता अधिक आहे. अद्याप एकाही नावाचा विचार झाला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, जी नावे चर्चेत आहेत.