
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले (Photo Credit- X)
याच कार्यक्रमादरम्यान एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले. त्यावर फडणवीसांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे यांना हाताळणे अतिशय सोपे आहे, कारण ते मनापासून भावनिक व्यक्ती आहेत. मी सुद्धा भावनिक आहे, त्यामुळे आमच्यातील ताळमेळ चांगला बसतो. जर तुम्हाला त्यांची भावनिक बाजू कळाली, तर त्यांच्यासोबत काम करणे खूप सुलभ जाते. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, उद्धवजींचे वागणे अतिशय अप्रत्याशित आहे. त्यांना समजून घेण्यासाठी मला एखादा ‘संशोधक’ नियुक्त करावा लागेल. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे कठीण होते.
महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादाच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्णविराम दिला. आम्ही एक मजबूत युती आहोत आणि पुढील पाच वर्षे ही युती एकत्र काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांवरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, शिंदेजी त्यांच्या कुटुंबाला किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला दिल्लीला जातात, त्यात काहीही गैर नाही. ते जोपर्यंत दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत नाहीत, तोपर्यंत मला काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांनी विनोदाने नमूद केले.
– मुंबईला पाणीपुरवठा वाढवण्यासाठी पुढील ५ वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार
– पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत १७ हजार कोटी रुपये
– बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
– सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार
– फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार
– लघु उद्योग धोरण राबवले जाणार
– पुर्नविकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी जाहीर केलेली योजना जलदगतीने राबविणार
– बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस
– बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत
– बेस्ट बसेसची संख्या ५ हजारवरुन १० हजारांवर जाणार
– स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार
– लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी व लघु उद्योग स्थापन करण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
– रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करणार
– पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार
– मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार
– बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आणि आर्थिक तरतूद राबवली जाणार
– पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार
– हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणार
– रविंद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुर्नविकास करणार आणि गरज पडल्यास ३ नवीन नाट्यगृहे उभारणार
– विकसित मुंबईसाठी २०३४ चा आराखडा तयार होणार
Sanjay Raut Live : संजय राऊत अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये 11 लाखांची पैज; फक्त अट एकच..!