Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेनी फिरवला गेम; ‘या’ बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश

Political News: माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. लालबाग-परळमधील या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 11, 2026 | 03:42 PM
मोठी बातमी! मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेनी फिरवला गेम (Photo Credit- X)

मोठी बातमी! मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेनी फिरवला गेम (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • लालबाग-परळमध्ये ‘उबाठा’ला खिंडार!
  • कट्टर शिवसैनिक दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
  • ठाकरेंवर घणाघाती टीका
Mumbai Political News: उबाठाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दगडू सकपाळ (Dagdu Sakpal) यांनी आज शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सकपाळ यांच्या प्रवेशाने महापालिका निवडणुकीपूर्वी लालबाग-परळमध्ये शिवसेनेने उबाठाला जोरदार झटका दिला. शिवसेना वाढवण्यासाठी तुरुंगवास भोगणारे, शेकडो केसेसे अंगावर घेणाऱ्यांना निष्ठावान शिवसैनिकांना बाळासाहेब सवंगडी समजायचे मात्र आज काहीजण बाळासाहेबांच्या सवंगड्यांना घरगडी समजत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली.
📍 #मुंबई | उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते, लालबाग परळचे माजी आमदार तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडू दादा सकपाळ यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. दगडू दादा सकपाळ यांच्यासह संपूर्ण सकपाळ कुटुंबाने हाती भगवा घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह उद्योजक… pic.twitter.com/f5RDW7Sybz — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 11, 2026


सकपाळ यांच्यासह अशोक सकपाळ, लक्ष्मण सकपाळ, मनसेचे शिवडी विभाग अध्यक्ष संतोष नलावडे, रेश्मा सकपाळ, सुषमा सकपाळ, जितेंद्र सकपाळ, संपत नलावडे, भरत मोरे, मनोज म्हात्रे, झाहीर शेख, क्षितीज सकपाळ, सुनील सकपाळ, अनिकेत कदम यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शिवसेना वाढीसाठी ज्यांनी कष्ट उपसले, शेकडो केसेस अंगावर घेतल्या अशा कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करणारे बाळासाहेब होते, आज बाळासाहेब नाहीत. त्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना ओळखणारा नेता नाही. शिवसेना वाचवण्यासाठी, गहाण टाकलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Sanjay Raut Live : संजय राऊत अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये 11 लाखांची पैज; फक्त अट एकच..!

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेसाठी, बाळासाहेबांच्या विचारांसाठी आणि धनुष्यबाणसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. दगुडदादा म्हणजे बाळासाहेबांचा कट्टर मावळा अशी ओळख आहे. त्यांच्यासारख्या अनेक शिवसैनिकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून शिवसेना वाढवण्याचे काम केले. स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. शिवसेनेसाठी त्यांनी अंगावर, छातीवर वार घेतले.

लालबाग परळ भागात शिवसेना वाढवण्यासाठी दगडू दादांनी अपार कष्ट घेतले. दगडू दादांच्या शिवसेना प्रवेशाने लालबागच्या राजाचा आणि गणेश गल्लीच्या राजाचा आशिर्वाद शिवसेनेला मिळाला, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. साडेतीन वर्ष शिवसेनेसाठी तुरुंगावास भोगला त्यांची अवहेलना करणं दुर्देवी आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

बेळगावचा लढा, आंदोलने केली शेकडो केसेस झाल्या पण त्याचा विचार कधी दगडूदादांनी केला नाही, असे ते म्हणाले. घाटकोपरच्या सभेमध्ये दगडूदादांनी एकनाथ शिंदे एक दिवस मोठा होईल असे भाकीत केले होते. मी शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालो, अशी आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काढली.

Maharashtra Election : “मेट्रो प्रकल्प रखडण्यामागे भाजपा कारणीभूत” ; विकास कामावर प्रताप सरनाईक यांचे गंभीर आरोप

दगडू सकपाळ म्हणजे कणखर नेतृत्व असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बाळासाहेब दगडूदादांना सवंगडी समजायचे, पण आताचे लोक सवंगड्यांना घरगडी समजायला लागले. मालक आणि नोकर हा भेद सुरु झाला, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली.

राज्यात २०१९ मध्ये आणि २०२२ मध्ये काय घडले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले. शिवसेनेने ८० जागा लढल्या आणि ६० जागा जिंकल्या त्यांनी १०० जागा लढल्या आणि २० जागा जिंकले. ठाण्यापुरता शिवसेना मर्यादित आहे, असं बोलणाऱ्यांची तोंड नगर परिषद निवडणुकीनंतर बंद झाली. शिवसेनेचा चांदा ते बांदा विस्तार झाला. शिवसेनेचे ७० नगराध्यक्ष आणि १४०० नगरसेवक निवडून आले, असे ते म्हणाले.

Web Title: Eknath shinde shocks thackeray group dagdu sakpal joins shivsena mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Eknath Shinde
  • Maharashtra Local Body Election
  • Mumbai
  • political news
  • shivsena
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Mahayuti Manifesto: मुंबईतील पाणी समस्या, बेस्टमध्ये महिलांना ५०% सवलत; महायुतीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?
1

Mahayuti Manifesto: मुंबईतील पाणी समस्या, बेस्टमध्ये महिलांना ५०% सवलत; महायुतीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

Mahayuti Mumbai Manifesto : महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध; मराठी माणसांसाठी केल्या ‘या’ खास घोषणा
2

Mahayuti Mumbai Manifesto : महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध; मराठी माणसांसाठी केल्या ‘या’ खास घोषणा

Pune News : पुणेकरांचा नाद नाही! लाडक्या बहिणींच्या पैशांचा उल्लेख करत मागितले मत; थेट केली आमदारांविरोधात तक्रार
3

Pune News : पुणेकरांचा नाद नाही! लाडक्या बहिणींच्या पैशांचा उल्लेख करत मागितले मत; थेट केली आमदारांविरोधात तक्रार

Raigad News: इच्छुक उमेदवारांचा हिरमोड! जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका लांबणीवर?
4

Raigad News: इच्छुक उमेदवारांचा हिरमोड! जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका लांबणीवर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.