
BJP Ravi Shankar Prasad Delhi house Fire News marathi Update
एका खोलीतील बेडमध्ये आग लागली
मीडिया रिपोर्टनुसार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे अधिकृत निवासस्थान दिल्लीतील लुटियन्स झोनमधील २१ मदर टेरेसा क्रेसेंट रोड येथे आहे. बुधवारी सकाळी ८:०५ वाजता आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या घरातील एका खोलीत ठेवलेल्या बेडमध्ये आग लागली.
रवीशंकर प्रसाद यांच्या शासकीय निवासस्थानी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हे देखील वाचा : वृद्ध पालकांना सांभाळले नाही तर होणार १०% पगार कपात; राज्य सरकारचा मोठा निर्णय
या घटनेबाबत माहिती देताना उप-अग्निशमन अधिकारी सुरेश एम म्हणाले, “आम्हाला फोन येताच आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. एका खोलीत आग लागली होती, जी आता विझवण्यात आली आहे. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळवले आहे. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही… कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.” अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : सरकारचा मोठा निर्णय! स्विगी-झोमॅटोची 10 मिनिटांत ‘डिलिव्हरी’ आता इतिहासजमा
घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानी आग लागल्यानंतर अग्निशमन दलासह, फॉरेन्सिक टीमही घरी पोहोचली. अग्निशमन विभाग आणि पोलिस आगीचे कारण तपासत आहेत.