Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Politics : मतं वाढली, तरीही तिसऱ्या क्रमांकावर; पंजाबमध्ये आपला रोखण्यात भाजप कमी पडतंय का? वाचा सविस्तर

लुधियाना वेस्ट विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा पंजाबात भारतीय जनता पक्षासाठी जुनाच ट्रेंड समोर आला आहे. पक्षाला लक्षणीय मतं मिळत असली तरी या मतांचं जागांमध्ये किंना विजयात रुपांतर होताना दिसत नाही.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 26, 2025 | 06:56 PM
मतं वाढली, तरीही तिसऱ्या क्रमांकावर; पंजाबमध्ये आपला रोखण्यात भाजप कमी पडतंय का? वाचा सविस्तर

मतं वाढली, तरीही तिसऱ्या क्रमांकावर; पंजाबमध्ये आपला रोखण्यात भाजप कमी पडतंय का? वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

लुधियाना वेस्ट विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षासाठी जुनाच ट्रेंड समोर आला आहे. पक्षाला लक्षणीय मतं मिळत असली तरी या मतांचं जागांमध्ये किंना विजयात रुपांतर होताना दिसत नाही.   2020-2021 मधील शेतकरी आंदोलनानंतर भाजप पंजाबामध्ये संघर्ष करत असून, या निवडणुकीनेही त्यात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळेच पक्षांतर्गत अनेकांनी आत्मपरीक्षण” करण्याची गरज असल्याचं मान्य केलं आहे.

Union Cabinet Meeting: महाराष्ट्रासह झारखंडला केंद्र सरकारकडून मोठे गिफ्ट; कॅबिनेट बैठकीत तीन मोठे निर्णय

या पोटनिवडणुकीत भाजपचे एकमेव दिलासादायक यश म्हणजे त्यांचा आधीचा मित्रपक्ष राहिलेल्या शिरोमणी अकाली दलापेक्षा (SAD) थोडी चांगली कामगिरी केली. पंजाबमधील हे प्रमुख प्रादेशिक पक्ष असूनही SAD चवथ्या क्रमांकावर राहिला. SAD चे प्रवक्ते अर्शदीप कलेर यांनी मात्र पक्षाची कामगिरी सकारात्मक झाल्यांचं म्हलटलं आहे. “आमचा मतदान टक्का मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट वाढला आहे. भाजप आणि कॉंग्रेसलाही करता आलं नाही. सत्ताधारी आम आदमी पक्ष (AAP) आघाडीवर असला तरी याचा अर्थ 2027 मधील विधानसभा निकाल असाच राहिल, असं नाही” असं त्यांनी एका राष्ट्रीय वृत्तपत्राशी बोलताना म्हटं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी मात्र या निकालाचे स्वागत केलं आहे. मात्र आपला हा निकाल आरसा दाखवणारा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी असा दावा केला की, हा निकाल “AAP आणि काँग्रेसपलिकडे पाहणाऱ्या जनतेचा इशारा” आहे. मात्र पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात असे मत उमटले की, फक्त मतदान टक्का वाढवण्यावर समाधान मानणे ही चूक ठरणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपला मतदान टक्का जवळपास दुप्पट करत 18.5% पर्यंत नेला होता, तरीही एकही जागा जिंकता आलेली नव्हती.

“या पोटनिवडणुकीने स्पष्ट संदेश दिला आहे – पंजाब भाजपला आता धोरणात्मक स्पष्टता, संघटनात्मक पुनर्रचना आणि कामाची नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर येणे किंवा केवळ अनामत रक्कम वाचवणे पुरेसे नाही. 2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड व तयारी आतापासूनच करावी लागेल,” असे पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने म्हटलं आहे.

लुधियाना वेस्टमध्ये भाजपने 22.5% मतदान मिळवले आणि SAD ला मागे टाकून तिसरं स्थान मिळवलं. ही जागा AAP ने जिंकली तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली. भाजपने प्रचारासाठी दिल्लीतल्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि रवीनीत बिट्टू यांच्यासह अनेक दिग्गजांना उतरवले होते. तरीही भाजपचा मतदान टक्का 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत किंचित घसरला आहे. त्या वेळी त्यांनी पंजाब लोक काँग्रेस (PLC) आणि SAD (संयुक्त) या दोन छोट्या पक्षांबरोबर आघाडी करत 24.2% मते मिळवली होती. त्यानंतर PLC भाजपमध्ये विलीन झाला असून SAD (संयुक्त) आता अस्तित्वात नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लुधियाना वेस्ट विधानसभा विभागात आघाडी घेतली होती, त्यामुळे ही जागा भाजपसाठी ‘वाढती’ मानली जात होती. मात्र काही नेत्यांच्या मते, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांचे वर्तन वेगळे असते. “जर लोकसभेतील ट्रेंड आधारभूत ठरत असते, तर काँग्रेसने जालंधर वेस्टची जागा 35,000 मतांनी गमावली नसती, जिथे त्यांनी एक महिन्यापूर्वीच लोकसभेची जागा 1.75 लाख मतांनी जिंकली होती,” असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

2022 च्या जूनमध्ये झालेल्या संगरूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप चौथ्या क्रमांकावर राहिला होता, SAD पेक्षाही पुढे. 2024 मध्ये जालंधर लोकसभेत भाजपने आपला मतदान टक्का वाढवून 21.64% केला (2023 च्या पोटनिवडणुकीत तो 15.18% होता), तरीही जागा मिळाली नाही.

जुलै 2024 मध्ये झालेल्या जालंधर वेस्ट पोटनिवडणुकीत (AAPचे आमदार शीतेल अंगुराल भाजपमध्ये आले होते) भाजप दुसऱ्या स्थानावर राहिला. मात्र 2022 मध्ये त्यांना येथे 28.81% मते मिळाली होती, ती 2024 मध्ये घसरून 18.94% झाली.

नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या चार विधानसभा पोटनिवडणुकीत – गिद्दरबाहा, चब्बेवाल, डेरा बाबा नानक आणि बरनाला – SAD शिरकत करू शकले नव्हते (सुखबीर बादल यांना अकाल तख्ताकडून धार्मिक शिक्षा झाल्यामुळे). तरीही भाजप या सर्व जागांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि फक्त बरनालामध्येच अनामत रक्कम वाचवू शकला.

यातही भाजपने काही प्रसिद्ध चेहरे मैदानात उतरवले होते – माजी मंत्री मनप्रीत सिंग बादल (गिद्दरबाहा), माजी स्पीकर निर्मलसिंग काळों यांचा मुलगा रवी करण काळों (डेरा बाबा नानक), तसेच SADमधून भाजपमध्ये आलेले चार वेळा आमदार झालेले सोहनसिंग थंडाल (चब्बेवाल) – पण कोणालाही उल्लेखनीय यश मिळाले नाही. विशेष म्हणजे थंडाल आता पुन्हा SADमध्ये परत गेले आहेत.

Gujarat Politics : गुजरातमध्ये ‘आप’ चा उदय कोणासाठी धोक्याची घंटा? भाजप की कॉंग्रेस? वाचा सविस्तर

भाजप 2027 साली विधानसभा निवडणुकीत आपला प्रभाव वाढवण्याच्या तयारीत आहे, पण संघटनेत सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकल्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी राजीनामा देऊ केला होता, मात्र केंद्रीय नेतृत्वाने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे संघटनेच्या पुनर्रचनेची प्रक्रिया रखडली आहे

पंजाबमध्ये भाजपला मतांचे टक्केवारीमध्ये वाढ दिसून येते आहे, पण ती राजकीय ताकद ठरण्यासाठी जागांमध्ये परिवर्तित होत नाही, ही पक्षासाठी चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पुढील निवडणुकांमध्ये खरोखरच काही वेगळे आणि ठोस करू शकेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title: Bjp votes increased but lost punjab bypolls seat why bjp failed to defeat aap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • Aam Aadami Party
  • BJP
  • Punjab News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये; इच्छुकांची धाकधूक वाढली
1

Maharashtra Politics: नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये; इच्छुकांची धाकधूक वाढली

Bihar Election 2025 च्या एक्झिट पोलपूर्वी २०२० च्या एक्झिट पोलमध्ये काय केले होतं भाकीत, निकालात कितीने पडला फरक?
2

Bihar Election 2025 च्या एक्झिट पोलपूर्वी २०२० च्या एक्झिट पोलमध्ये काय केले होतं भाकीत, निकालात कितीने पडला फरक?

Bihar Election Phase 2 Voting: बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात 122 जागांसाठी मतदान; कुणाची सत्ता येणार?
3

Bihar Election Phase 2 Voting: बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात 122 जागांसाठी मतदान; कुणाची सत्ता येणार?

Mohan Bhagwat News: हिंदू असण्याचा अर्थ भारतासाठी जबाबदार असणे..; मोहन भागवतांचे सूचक विधान
4

Mohan Bhagwat News: हिंदू असण्याचा अर्थ भारतासाठी जबाबदार असणे..; मोहन भागवतांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.