महाराष्ट्रासह झारखंडला केंद्र सरकारकडून मोठे गिफ्ट; कॅबिनेट बैठकीत तीन मोठे निर्णय
Union Cabinet Meeting: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज (२५ जून) झालेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंडला मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्रासाठीदेखील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात, पुणे मेट्रोच्या लाईन-२ साठी ३,६२६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने ५,९४० कोटी रुपयांच्या पुनर्वसनासाठी सुधारित झरिया मास्टर प्लॅनला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३ मोठे निर्णय घेण्यात आले. पुणे मेट्रो विस्तारासाठी ३६२६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. दुसरे म्हणजे, झरिया (झारखंड) हा भूमिगत आगीचा खूप जुना मुद्दा आहे. यासाठी ५९४० कोटी रुपयांचा सुधारित मास्टर प्लॅन मंजूर करण्यात आला. तिसरे म्हणजे, आग्रा येथे १११ कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र उभारले जाईल.”
बाळासाहेब ठाकरे अन् तत्कालीन RSS सरसंघचालकांचा आणीबाणीला पाठिंबा? शिवसेनेच्या नेत्याचा अजब दावा
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंत्रिमंडळाची मंजुरी वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर-२अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर-ब) या रस्त्यांना विद्यमान वनाझ-रामवाडी कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचा विस्तार म्हणून मान्यता देण्यात आली आहे. एलिव्हेटेड कॉरिडॉर १२.७५ किमी लांबीचा असेल आणि त्यात १३ स्थानके असतील.
केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सिंगना येथे दक्षिण आशिया प्रादेशिक आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र (CIP) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश बटाटा आणि रताळ्याची उत्पादकता, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन सुधारून अन्न आणि पोषण सुरक्षा, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि नवीन रोजगार वाढवणे आहे.
माजी न्यायाधीशांसह ९७२ जण पीएफआयचे लक्ष्य, एनआयएचा खुलासा; कोण कोण हिटलिस्टमध्ये? पाहा यादी
अश्विनी वैष्णव यांनी भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अॅक्सिओम मिशन ४ चा भाग बनवण्याबाबतचा प्रस्ताव वाचून दाखवला. ते म्हणाले, “भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेतील अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अंतराळ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे आम्ही स्वागत करतो. भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय बनण्याच्या मार्गावर आहेत. ते आपल्यासोबत १.४ अब्ज भारतीयांच्या इच्छा, आशा आणि आकांक्षा घेऊन गेले आहेत.”