आता भारताचंही स्वत: चं AI मॉडेल येणार; निर्मला सीतारामण यांची मोठी बजेटमध्ये मोठी तरतूद
जगात सध्या एआय (AI)अर्थात आर्टिफीशीअल इंलिजन्सचा बोलबाला आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक क्षेत्रात याचा वापर वाढणार आहे. नुकताच चिनच्या डीपसीक ची यात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे भारतानेही या क्षेत्रात स्वत:चं चॅटबॉट निर्माण करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे एआय शिक्षणासाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत ३ एआय एक्सलन्स सेंटर्स स्थापन करण्यात येणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे.
Budget 2025 : पुढील आठवड्यात सादर केले जाणार नवीन आयकर विधेयक; अर्थमंत्र्यांची माहिती
भारत जागतिक AI (आर्टिफिशियल डिलिजन्स) क्षेत्रात पकड मजबूत अस्तित्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कालचं याची माहिती दिली होती. भारत लवकरच डीपसीक आणि चॅटजीपीटी सारख्या प्रमुख AI प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी स्वदेशी AI मॉडेल लाँच करेल. इंडिया AI मिशन अंतर्गत, हे स्वदेशी AI मॉडेल पुढील काही महिन्यांत सादर केलं जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही तास आधी अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिल्यामुळे अर्थसंकल्पात मोठी घोषणा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चीनी AI मॉडेल DeepSeek ने प्रवेश करत अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये खळबळ उडवली आहे. OpenAI, Google आणि Microsoft सारख्या टेक कंपन्यांनी धसका घेतला आहे. आता भारत देखील या दिशेने वेगाने काम करत आहे आणि पुढील 10 महिन्यांत भारताचं स्वत:चं एआय मॉडेल तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. भारत स्वतःचे लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) विकसित करत आहे. या मिशनला प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने 18,000 हाय-एंड ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (GPUs) ने सुसज्ज आधुनिक AI सुविधेची स्थापना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक व्हिजन अंतर्गत, इंडिया AI मिशनची पहिली मोठी उपलब्धी म्हणजे कॉमन कॉम्प्युट फॅसिलिटीची स्थापना. सुविधेमध्ये 18,693 GPU समाविष्ट आहेत, सुरवातीच्या 10,000 GPU पेक्षा ८६९३ ची वाढ करण्यात आली आहे. कॉमन कॉम्प्युट फॅसिलिटी पायाभूत मॉडेल्स विकसित करणार्या AI स्टार्टअप्स या कॉमन कॉम्प्युट सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. अर्थसंकल्पातील आजच्या तरतूदीमधून भारताच्या एआय मॉडेला बुस्ट मिळण्याची शक्यता आहे.