File Photo : Budget 2025
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. महागाई कमी करण्यासाठी आणि टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या जातील, अशी शक्यता होती. त्यानुसार, आता 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असे करण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात एक मोठी घोषणा केली आहे. नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाणार आहे. ज्यामध्ये अनेक मोठे बदल दिसून येतील, असेही सांगण्यात आले आहे. कर व्यवस्थेत बदल होणार आहे. आता नवीन आयकर कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत सादर केला जाईल. हा एक नवीन कायदा असेल, विद्यमान कायद्यात सुधारणा केली जाणार नसल्याचेही सांगण्यात आले.
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही निर्यात क्षेत्रात एक योजना सुरू करणार आहोत. नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात सादर केले जाईल. गेल्या 10 वर्षांत व्यवसाय करण्याच्या सुलभतेत सुधारणा केली आहे.
दरम्यान, सुधारणेसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. यामुळे परवाने आणि मान्यता मिळविण्याच्या प्रणालीवर लक्ष ठेवले जाईल. जन विश्वास कायदा २०२३ अंतर्गत, १८० कायदेशीर तरतुदींना गुन्हेगारी श्रेणीतून वगळण्यात आले आहे.