Bulldozer action at Padma Shri hockey player Mohammad Shahid's house Varanasi Uttar Pradesh News
Bulldozer action in UP : वाराणसी : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळामध्ये बुलडोझर कारवाई ही अत्यंत लोकप्रिय झाली आहे. यावरुन न्यायालयाने अनेकदा योगी सरकारला फटकारले आहे. मात्र आता पुन्हा एकदा वाराणसीमध्ये बुलडोझर कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास 13 घरे पाडण्यात आली. यामध्ये माजी ऑलिपिंक पद्मश्री पुरस्कार विजेत्या दिवंगत खेळाडूचे घर देखील पाडण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा बुलडोझर कारवाई ही चर्चेमध्ये आली आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये पोलिस लाईन ते कोर्टापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या दरम्यान बुलडोझर कारवाई करण्यात आली असून त्याची जोरदार चर्चा सुरु करण्यात आला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी एकूण 13 घरे पाडण्यात आली. या घरांमध्ये माजी ऑलिंपियन आणि पद्मश्री हॉकी खेळाडू दिवंगत मोहम्मद शाहिद यांचे घर होते. रस्ता रुंदीकरणासाठी ही कारवाई करण्यात आली. शाहिदच्या कुटुंबाने पोलिस आणि प्रशासनाशी वाद घातला आणि कारवाई थांबवण्याची मागणी केली, परंतु त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि बुलडोझर वापरण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वाराणसी बुलडोझर कारवाईवर प्रशासनाचे म्हणणे आहे की घरात राहणाऱ्या नऊ सदस्यांपैकी सहा जणांनी भरपाई स्वीकारली होती, तर उर्वरित सदस्य अधिक वेळ मागत होते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बुलडोझर कारवाईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वृद्ध मुस्लिम माणूस एका पोलिसाला असे म्हणताना ऐकू येतो की, “मिश्रा जी, मी तुमचे पाय धरतो. मला आजचा फक्त वेळ द्या, आम्ही उद्या ते काढून टाकू.” अखिलेश यादव यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
माजी ऑलिंपियन आणि पद्मश्री हॉकी खेळाडू मोहम्मद शाहिदच्या कुटुंबाने प्रशासनाच्या या कृतीचा तीव्र निषेध केला. त्यांची मेहुणी नाजनीन यांनी सांगितले की त्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही आणि त्यांचे दुसरे घरही नाही. परिणामी, ते बेघर होतील. शाहिदचे मामा मुश्ताक यांनी आरोप केला की त्यांच्या कुटुंबात लग्न होते आणि त्यांची इतरत्र जमीन नव्हती. त्यांनी म्हटले की ही फक्त “प्रशासकीय गुंडगिरी” आहे आणि पुनर्वसनासाठी कोणतीही व्यवस्था केली जात नाही, असा आरोप खेळाडूच्या परिवाराने केला आहे. मुश्ताक यांनी असा आरोपही केला की मुस्लिमबहुल भागातील रस्ता जाणूनबुजून २१ मीटरऐवजी २५ मीटर रुंद केला जात आहे आणि यासाठी त्यांनी मंत्री रवींद्र जयस्वाल यांना जबाबदार धरले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भरपाई आणि कारवाईबाबत प्रशासनाची भूमिका
वाराणसीचे एडीएम शहर आलोक वर्मा यांनी या विषयावर आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी आधीच भरपाई मिळालेल्यांना काढून टाकण्याची कारवाई केली जात आहे. वर्मा म्हणाले की बुलडोझरने पाडताना काही नुकसान होऊ शकते, परंतु कोणताही भाग अनावश्यकपणे पाडला जात नाही.
जुल्म करनेवाले न भूलें नाइंसाफ़ी की भी एक उम्र होती है। pic.twitter.com/aY18bJe8DU — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 28, 2025
दिवंगत पद्मश्री खेळाडू मोहम्मद शाहिद यांच्या घराबाबत त्यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबात नऊ सदस्य आहेत, त्यापैकी सहा जणांना भरपाई देण्यात आली आहे. तिघांना स्थगिती आदेश होता, त्यामुळे त्यांचे भाग सोडण्यात आले आहेत. एडीएम यांनी असेही सांगितले की कुटुंबाने लग्नाचे कारण देत वेळ मागितला होता, परंतु त्यांनी भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दिली नाहीत.
कार्यवाही आधीच करण्यात आली
सार्वजनिक बांधकाम विभागाने सांधा ते पोलिस लाईनपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण केले आहे हे माहिती आहे. या टप्प्यात, पोलिस लाईन चौक आणि न्यायालयादरम्यानची ५९ घरे पाडण्याचे काम तीन टप्प्यात पूर्ण झाले आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की ही कारवाई कायद्यानुसार केली जात आहे, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.