छत्रपती घराण्याचा अपमान; खासदार शाहू महाराजांना शासकीय निवासस्थानच नाही...
Chhatrapati Shahu Maharaj: लोकसभा आणि राज्यसभेवर निवडून गेलेल्या खासदारांना दिल्लीत शासकीय निवासस्थान दिले जाते. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत 1922 मध्ये स्थिती संचालनालय या विभागामार्फत मंत्री आणि खासदारांना शासकीय बंगल्याचे वाटप केले जाते. हा विभाग निवास कायद्यातंर्गत बंगल्यांचे, फ्लॅटचे वाटप केले जाते. पण कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांना अद्याप दिल्लीत शासकीय निवासस्थान मिळालेले नाही. गेल्या दीड वर्षांपासून त्यांना महाराष्ट्र सदनातच राहण्याची वेळी आली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराज विजयी झाले. त्यांनी खासदारकीची शपथ घेऊन आता दीड वर्ष झाले तरी त्यांना खासदार निवास मिळाले नसल्याने त्यांनी याविषयी जाहीर कार्यक्रमात खंत व्यक्त केली. मराठा महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, मी खासदार होऊन दीड वर्षे झाले. पण मला अजूनही दिल्लीत घर मिळालेले नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून मला महाराष्ट्र सदनातच राहावे लागत आहे.
India Rain Alert: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात वरुणराजा तांडव करणार; IMD च्या रेड अलर्टने थेट…
तसेच, मराठा समाज मागे पडत असून समाजाने शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे, आणि मराा समााने स्वत:ही खंबीर राहणे महत्त्वाचे असल्याचे खासदार शाहु महाराजांनी म्हटले. यासोबतच राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी, असा टोलाही त्यांनी यावेळ लगावला. या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे नेते धनंजय महाडिक, शिवसेनेचे नेते आमदार चंद्रदीप नरके हे देखील उपस्थित होते. त्यांच्याच उपस्थित केंद्र सरकार बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा नवा प्रयोग; ‘या’ टोळ्याकडून काळ्या पैशाचा हिशेब घेतला जाणार
दरम्यान एक वर्षापूर्वी देखील शाहू महाराजांनी या विषयी नाराजी व्यक्त केली होती. लोकसभा सदस्य कोणत्याही पक्षाचा असो त्याला केंद्र सरकारने सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. दरम्यान, शाहु महाराजांना दिल्लीत खासदार निवासस्थान मिळत नसल्याने कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक उमेदवार होते. या निवडणुकीत तब्बल दीड लाखांच्या मताधिक्क्याने शाहू महाराज विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले होते.