Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकारकडून मोठा निर्णय जाहीर, आरोग्यासाठी धोकादायक 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी

केंद्र सरकारने शुक्रवारी 14 फिक्स्ड-डोज कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर उपचारात्मक स्पष्टता नसल्याच्या कारणावरुन बंदी घातली आहे.

  • By साधना
Updated On: Jun 03, 2023 | 02:31 PM
fdc medicine banned

fdc medicine banned

Follow Us
Follow Us:

केंद्र सरकारने 14 औषधांवर बंदी घातली आहे. डीजीसीआय (DCGI) म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने (Drugs Controller General of India) आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आज हा नवा निर्णय जारी केला आहे.

भारत सरकारने 14 प्रकारच्या फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC – Fixed Dose Medicine) औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांचा संबंधित रोगांवर होणारा परिणाम आणि उपचारात्मकतेबाबत स्पष्टता आढळून आल्याने डीसीजीआयने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने आता 14 प्रकारच्या FDC कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे.

डीजीसीआय (DCGI) च्या तज्ञांच्या समितीने आधी 14 प्रकारची FDC कॉम्बिनेशन असणारी औषध मानवी आरोग्यासाठी घातक असून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. डीसीजीआयने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर  या औषधांवर बंदी घातली आहे.

फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषध
दोन किंवा अधिक घटक एकाच औषधात एकत्र मिसळलेले असणे म्हणजे फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC – Fixed Dose Medicine) होय. यामध्ये Nimesulide + Paracetamol dispersible गोळ्या आणि Pholcodine + Promethazine या सारख्या घटकांचा समावेश आहे.

कॉकटेल ड्रग
केंद्र सरकारने शुक्रवारी 14 फिक्स्ड-डोज कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर उपचारात्मक स्पष्टता नसल्याच्या कारणावरुन बंदी घातली आहे. फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDCs) ही अशी औषधे, ज्यामध्ये एका गोळीमध्ये एकापेक्षा जास्त औषधे एकत्र असतात. यानांच कॉकटेल (Cocktail Drug) औषधे असंही म्हटलं जातं.

डीजीसीआयच्या मागणीनंतर केंद्राचं मोठं पाऊल
या औषधांच्या उपचाराबाबत कंपनीला स्पष्टीकरण नसल्याने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. शिवाय या औषधांमुळे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचंही डीसीजीआयच्या तज्ज्ञ समितीला आढळून आलं होतं. त्यानंतरच डीजीसीआय (DCGI) तज्ज्ञांच्या पॅनेलने त्यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, “तज्ज्ञ समितीने या औषधांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. या औषधांच्या उपचारात्मकतेबाबत स्षटता नाही आणि यामुळे मानवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या 14 FDCs औषधांचे उत्पादन, विक्री किंवा वितरण प्रतिबंधित करणे आवश्यक आहे, असं सांगितलं आहे. तज्ज्ञ समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या शिफारशींच्या आधारे हे मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

Web Title: Central government banned 14 fixed dosed medicine nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2023 | 02:27 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी
1

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी

HPCL Renewable Energy: वीजनिर्मितीसोबत जमीन-पाण्याचीही बचत; HPCLचे कृषी-सौर आणि फ्लोटिंग सोलार मॉडेल ठरणार गेमचेंजर
2

HPCL Renewable Energy: वीजनिर्मितीसोबत जमीन-पाण्याचीही बचत; HPCLचे कृषी-सौर आणि फ्लोटिंग सोलार मॉडेल ठरणार गेमचेंजर

दिल्ली-अहमदाबाद-सुरत ते मुंबई-पुणे-गोवा; Amazon India चे रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत, १४० हून अधिक ट्रेन धावणार
3

दिल्ली-अहमदाबाद-सुरत ते मुंबई-पुणे-गोवा; Amazon India चे रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत, १४० हून अधिक ट्रेन धावणार

Visually Impaired Judge: केरळच्या थान्या नाथन बनल्या देशातील पहिल्या महिला दृष्टीहीन जज! जाणून घ्या त्यांची यशोगाथा..
4

Visually Impaired Judge: केरळच्या थान्या नाथन बनल्या देशातील पहिल्या महिला दृष्टीहीन जज! जाणून घ्या त्यांची यशोगाथा..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.