Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चांद के पास’, इस्रोनं दिली गूडन्यूज! चांद्रयान-3 चा पाचव्या आणि अंतिम कक्षेत यशस्वी प्रवेश

इस्रोने सांगितले की आता प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल त्यांच्या स्वतंत्र प्रवासासाठी तयार होत आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 16, 2023 | 10:23 AM
‘चांद के पास’, इस्रोनं दिली गूडन्यूज! चांद्रयान-3 चा पाचव्या आणि अंतिम कक्षेत यशस्वी प्रवेश
Follow Us
Follow Us:

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (Isro) आज सकाळची सुरवात एका आंनदाच्या बातमीने केली आहे. आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान (Chandrayaan 3) मोहिमेअंतर्गत  इस्रोने मोठी अपडेट दिली असून चांद्रयान-3 नं चंद्राच्या (Lunar Orbit) पाचव्या आणि शेवटच्या कक्षेत यशस्वीरीत्या यशस्वी प्रवेश केला आहे.

5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश

14 जुलैला आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन सेंटर येथून दुपारी 2.35 वाजता हे चांद्रयान-3  अवकाशात झेपावलं. त्यानंतर हे यान आज 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचलं होतं. आता ते त्याच्या पुढच्या महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजेच चंद्राकडे वळले आहे. चांद्रयान-3  नं चंद्राच्या पाचव्या आणि अंतिम कक्षेत यशस्वी प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ही माहिती दिली आहे. सुमारे २३ दिवसांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल असा अंदाज आहे.

इस्रोनं ट्विट करत दिली माहिती

बेंगळुरूमधील इस्रो टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC) कडून चांद्रयानाच्या हालचालींना ट्रॅक करण्यात येत आहे. आज सकाळी 8.30 वाजता चांद्रयान 3 पाचव्या आणि अंतिम कक्षेत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं.

” चांद्रयान-3 ला 153 किमी x 163 किमीच्या कक्षेत, प्रवासावर आहे. यासह, चंद्रावर जाणारी परिक्रम पूर्ण झाली आहे,” इस्रोने म्हटले आहे.

Chandrayaan-3 Mission: Today’s successful firing, needed for a short duration, has put Chandrayaan-3 into an orbit of 153 km x 163 km, as intended. With this, the lunar bound maneuvres are completed. It’s time for preparations as the Propulsion Module and the Lander Module… pic.twitter.com/0Iwi8GrgVR — ISRO (@isro) August 16, 2023

चांद्रयान-3 चा आतापर्यंत प्रवास

चांद्रयान-3 ने आतापर्यंत चांगला प्रवास केला आहे. 14 जुलैला चांद्रयान 3 हे यान 170 किमी x 36,500 किमीच्या पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि 14 दिवस प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. या मोहिमेद्वारे इस्रो चंद्रावरील पाण्याचा शोध घेणार आहे. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात हे देखील कळेल. 22 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.15 च्या सुमारास चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे.

चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर काय?

चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर इस्रोकडून चांद्रयान 3 वर वेगवेगळे प्रयोग करण्यात येतील. चंद्राच्या कक्षेत 100 किमी अंतरावर लँडर मॉड्युलरपासून वेगळा होईल. त्यानंतर सॉफ्ट लँडिंगचा प्रवास सुरु होईल. सॉफ्ट लँडिंगनंतर रोव्हर लँडरमधून बाहेर येऊन आपल्या वैज्ञानिक चाचण्या सुरु करेल.

Web Title: Chandrayaan 3 fifth and final orbit reduction manoeuvre completed lander to separate tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2023 | 10:17 AM

Topics:  

  • Chandrayaan 3
  • ISRO
  • lunar orbit

संबंधित बातम्या

ISRO मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी! अध्यक्षांच्या कार्यालयात ईमेल येताच संपूर्ण संकुल रिकामे, परिसरात खळबळ
1

ISRO मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी! अध्यक्षांच्या कार्यालयात ईमेल येताच संपूर्ण संकुल रिकामे, परिसरात खळबळ

Mission Aagaman: भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेटचे ‘मिशन आगमन’; स्काय-रूटचे विक्रम-1 पहिल्यांदाच अवकाशात दाखल होणार
2

Mission Aagaman: भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेटचे ‘मिशन आगमन’; स्काय-रूटचे विक्रम-1 पहिल्यांदाच अवकाशात दाखल होणार

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी
3

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.