Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court News: लिव्ह-इनमध्ये मूल झाले, मग तो बलात्कार कसा? सुप्रीम कोर्टाचा महिलेला सवाल

सुप्रीम कोर्टाने पीडित महिलेबद्दल सहानुभूती व्यक्त केली. ती मुलासाठी पोटगी मागू शकते. परतु, लिव्ह-इन रिलेशनशिप तुटणे हा फौजदारी गुन्ह्याचा आधार असू शकत नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 28, 2026 | 10:31 AM
Supreme Court, Live In Relationship, Legal News, Justice B V Nagarathna,

Supreme Court, Live In Relationship, Legal News, Justice B V Nagarathna,

Follow Us
Follow Us:
  • लिव्ह-इन रिलेशनशिपमधून बाहेर पडणे हा स्वतःहून कोणताही फौजदारी गुन्हा ठरत नाही-
  • प्रौढ व्यक्ती जेव्हा संमतीने अशा नात्यात राहतात तेव्हा त्यात काही अंगभूत जोखीम असते
  • लग्नाशिवाय असलेल्या नात्यांमधील है अनिश्चित स्वरूप आहे
 

Supreme Court of India  : लिव्ह-इन रिलेशनशिपमधून बाहेर पडणे हा स्वतःहून कोणताही फौजदारी गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदविले. लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका पुरुषाने बलात्कार व मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना ‘लिव्ह-इन’ संबंध आणि गुन्हेगारी स्वरूपाचे लैंगिक अत्याचार यातील फरक न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी स्पष्ट केला, तसेच, लग्नाच्या बंधनाशिवाय अशा नात्यांमध्ये असणाऱ्या जोखमींकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

न्यायमूर्ती नागरत्ना यांनी नमूद केले की, प्रौढ व्यक्ती विवाहाशिवाय एकत्र राहण्याचा निर्णय घेतात, तेव्हा अशा नात्यांमध्ये काही अंगभूत जोखीम असते. विवाहाशिवाय तिने त्या पुरुषासोबत राहून एका मुलाला जन्म दिला आणि आता ती बलात्कार व मारहाणीचे आरोप करत आहे. हे काय आहे?, संमतीने असलेल्या नात्यात असे आरोप कसे होऊ शकतात, असे ते म्हणाले.

Narendra Modi : ‘बंगालमध्ये BJP चा मुख्यमंत्री शपथ घेणार’; पीएम नरेंद्र मोदींचा बंगाली भाषेतील ऑडिओ प्रसिद्ध

लग्नाशिवाय असलेल्या नात्यांमधील हे अनिश्चित स्वरूप

संमतीने शरीरसंबंध आणि नंतर बलात्काराचा आरोप, अशा प्रश्नांवर अनेकदा पीडितेवरच टीका केली जाते. मात्र, संमती ‘वे स्वरूप समजून घेणे महत्वाचे असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले, जेव्हा नाते संमतीने असते, तेव्हा तिथे गुन्ह्याचा प्रश्नच कुठे येतो? लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये हेच घडते. अनेक वर्षे ते एकत्र राहतात आणि जेव्हा ते वेगळे होतात, तेव्हा ती महिला पुरुषाविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल करते. लग्नाशिवाय असलेल्या नात्यांमधील है अनिश्चित स्वरूप आहे, असे निरीक्षणही न्यायमूर्तीनी नोंदवले.

 

रिलेशनशिप तुटणे हा फौजदारी गुन्ह्याचा आधार नाही

सुप्रीम कोर्टाने पीडित महिलेबद्दल सहानुभूती व्यक्त केली. ती मुलासाठी पोटगी मागू शकते. परतु, लिव्ह-इन रिलेशनशिप तुटणे हा फौजदारी गुन्ह्याचा आधार असू शकत नाही. संबंध अवैध असू शकतात, परंतु अशा संबंधातून जन्माला आलेले मूल अवैध असू शकत नाही. तिथे विवाह झाला असता, तर तिचे अधिकार अधिक भक्कम असते, असे स्पष्ट करत न्यायालयाने दोन्ही बाजूंना हे प्रकरण मध्यस्थीद्वारे सोडवण्याचा सल्ला दिला आहे.

Political News : AAP ला मोठा धक्का; राज्यसभेच्या सभापतींकडून 7 खासदारांच्या BJP मधील विलीनीकरणाला मंजुरी

आरोपी आधीच विवाहित याचिकाकर्त्यांच्या वकिलानी सांगितले की, आरोपीने पीडित महिलेशी भेट घेतली, त्यावेळी तिच्या पतीचे निधन झाले होते, तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन शरीर संबंध ठेवले.

आरोपी आधीच विवाहित होता, मात्र महिलेला त्याबद्दल माहिती नव्हती, असा दावा वकिलांनी केला.

यावर न्यायमूर्ती नागरत्ना यांनी विचारले की, लग्नाआधीच त्या पुरुषासोबत राहण्याचा आणि मुलाला जन्म देण्याचा निर्णय तिने का घेतला? जेव्हा वकिलांनी असा दावा केला की, आरोपीने इतर महिलांसोबतही असेच केले आहे, तेव्हा न्यायालयाने स्पष्ट केले की, न्यायालय केवळ याचिकाकर्त्याच्या प्रकरणाचा विचार करत आहे.

 

 

Web Title: Child born in live in then how is it rape supreme court questions womans allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द
1

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम
2

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
3

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.