
Union Minister Amit Shah's Maharashtra tour suddenly postponed, what is the exact reason, read in detail
अरुणाचल प्रदेश– मागील आठवड्यात चीनने (China) अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal pradesh) घुसखोरी करत काही जागांची नावे बदलल्याची माहिती समोर आली होती. मागील कित्येक वर्षांपासून चीनच्या भारताविरोधी कुरापती सुरु आहेत. चीनच्या घुसखोरीमुळं देशात चीनविरोधात संतापाची उसळली आहे. दरम्यान, रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असताना, चीनला सज्जड दम दिला आहे. सुईच्य टोकाएवढी जमीन देखील आम्ही चीनला देणार नाही, असा इशारा गृहमंत्री अमित शहांनी चीनला दिला आहे. (Amit Shah On China)
काय म्हणाले अमित शहा?
दरम्यान, रविवारी अमित शाह हे अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी किबिथू येथे ‘व्हाईब्रेंट व्हिलेज प्रोग्राम’ आणि विविध विकास योजनांचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी चीनच्या घुसखोरीवरुन चीनला चोख प्रत्युत्तर देत, इशारा देखील दिला. “आमच्या जमिनीकडे जर कुणीही डोळे वर करुन बघितले तर, आम्ही शांत बसणार नाही, जसाच तसे उत्तर देऊ, करार जवाब मिलेगा…” असे संकेत शहांनी चीनला दिला आहे.
सैनिकांमुळं देश शांत झोपतो…
आमचे आयटीबीपीचे जवान आणि सेना आमच्या सीमारेषांवर दिवसरात्र तैनात आहेत. सैनिकांच्या पराक्रमामुळे आमची भूमी सुरक्षित आहे. सैनिकांमुळं संपूर्ण देश आज आपापल्या घरात सुखानं झोप घेत आहे. कारण त्यामुळे वाईट नजर टाकण्याची कुणाचीच हिंमत नाहीये आमच्या देशात अतिक्रमण तर सोडाच पण सुईच्या टोकाऐवढी जमीनही कुणी घेऊ शकणार नाही. असं अमित शहा म्हणाले.