
Why Nepal Started Printing Its Currency Notes From China Instead Of India
खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्याची मोठी कारवाई; २६ दहशतवादी ठार केल्याचा दावा
केवळ नेपाळच नव्हे, तर श्रीलंका, मलेशिया, थायलंड, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि म्यानमारसह भारताच्या या शेजारी देशांनी देखील चीनसोबत करार केला. आता यामागे तशी अनेक कारणे आहेत. आज आपण नेपाळ नेमका चीनच्या बाजूने का झुकत आहे? याबद्दल जाणून घेऊयात.
नेपाळ आणि भारताचे संबंध गेल्या काही काळात तणावाचे राहिले आहेत. नेपाळवर आता चीनचा प्रभाव पडत असून त्याने भारताकडून नोट छपाई देखील बंद केली आहे. २०१५ पासून नेपाळ चीनवर अवलंबून राहू लागला आहे. नेपाळने सध्या भारताकडून नोट छपाई पूर्णपणे बंद केली आहे. नेपाळच्या नॅशनल बॅंकने चीनला ४३० दशलक्ष १,००० रुपयांच्या नोटांचे डिझाइन आणि छपाईचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.
भारत आणि नेपाळमधील या वादाचा फायदा चीनने उचलला. पूर्वी १९४५ ते १९५५ दरम्यान नेपाळी नोटा भारतात नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये छापल्या जात होत्या. परंतु दोन्ही देशांतील तणावामुळे नेपाळने चलन छपाईचे काम चीनला देण्यास सुरुवात केली.
शिवाय चीनच्या तंत्रज्ञानामुळे इतर शेजारी देशांचा भारतावरील विश्वासही कमी होत गेला आणि श्रीलंका, मलेशिया, थायलंड, म्यानमार, बांगलादेश, अफगाणिस्तान चलन छपाईसाठी चीनवर अवलंबून झाला. सध्या चीनमध्ये नोटा छपाई भारताच्या तुलनेने स्वस्त आहे.
चीनच्या या नोटा छपाईच्या मशीमध्ये CBPMC वॉटरमार्क, रंग बदलणारी शाई, होलोग्राम, सुरक्षा धागे आणि नवीन कलरडान्स तंत्रज्ञानासह नोटा छपाई करत आहे. या तंत्रज्ञानामुळे डुप्लिकेट नोटा बनवणे अत्यंत कठीण आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळेच नेपाळ, मलेशिया, थायलंडसह भारताच्या अनेक शेजारी देशांनी आपले चलन छपाईचे कॉन्ट्रॅक्ट चीनला दिले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि भारताच्या शेजारी देशांमध्ये चीनचा वाढता प्रभाव भारताठी धोकादायक ठरत आहे.