
China's is going to the moon by 2030 know about the mission
अंतराळातील जीवशास्त्रात चीनचा मोठा शोध? ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं रहस्य उघड
चीनच्या चंद्रावर जाण्याच्या तयारीने वेग घेतला असून २०२३० पर्यंत चीन मानवाला चंद्रावर पोहोचवले असे म्हटले जात आहे. चीनने चंद्र मोहिमेसाठी वेगाने प्रयत्न सुरु केले आहे, पण यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. चीनने मानवाला चंद्रावर उतरवले तर, अंतरिक्ष क्षेत्रात अमेरिकेची प्रतिमा धोक्यात येऊ शकते. नासाच्या आर्टेमिस-३ मिशन २०२७ मध्ये नियोजित आहे. पण याच्या विलंबामुळे चीनची मोहिम आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी चीनने २००३ मध्ये अंतरिक्षवर मोठी झेप घेतली होती. चीनचे अंतराळवीर लिवेई यांनी शेनझोउ- ५ या मोहिमेद्वारे अंतराळात उड्डाण केले होते. चीनने अंतराळात तियांयोंग नावाचे स्वत:चे स्पेस स्टेशनही उभारले आहे. २०३० मध्ये नासाचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बंद होणार आहे, यामुळे अंतराळात केवळ चीनचे स्थानकच राहिल.
दुसरीकडे, गेल्या महिन्यात चीनने शेनझोउ-२१ मिशनअंतर्गत तीन अंतराळवीरांना तियांगोंगवर पाठवले होते. हे अंतराळवीर आता परत आले असून यांनी अंतराळात जैविक शास्त्रावर अभ्यास केला. त्यांच्यासोबत जाताना उंदिर, मांजर, झेब्राफिश यांसारखे प्राणी पाठवण्यात आले होते. त्यांना काही काळ अंतराळात ठेवण्यात आले. सध्या या प्राण्यांना परत आणण्यात आले असून चीन अंतराळातील वातावरणाचा जीवसृष्टीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच फायर सायन्सेसचाही अभ्यास चीन करणार आहे.
यापूर्वी चीनने चांग ई-६ मोहिमेद्वारे चंद्राच्या फार साइडवरुन काही नमुने पृथ्वीवर आणले होते. सध्या चीन 2026 आणि 2028 मध्ये चँग ई-7 आणि चांग ई-8 मिशन्स लाँच करणार असून याअंतर्गत चंद्रावर पाण्याचा शोध घेतला जाणार आहे. चीनला चंद्रावर स्वत:चा तळ उभा करायचा आहे, यामुळे नासाने चीनला चंद्रावर पाणी सापडले असल्याचा दावा केला आहे. पण यावर चीनने अशी कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. परंतु चीनच्या या मोहिमेच्या तयारीच्या वेगाने स्पष्ट झाले आहे की, चीन चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.