
India continues to buy Russian oil despite pressure from US and Europe
Indian Crude Oil Imports : युरोपियन देश आणि अमेरिका यांच्या दबावाला न जुमानता भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करत आहे. भारत सध्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देण्यावर भर देत आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांचे भारत बऱ्याच काळापासून लक्ष्य बनले आहे. त्याला कारण असे की, रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे अमेरिकेला मान्य नव्हते. तरीही भारत या देशांच्या दबावाला न जुमानता मोठ्या प्रमाणात रशियन तेल आयात करत आहे.
भारताने रशियाकडून ऑक्टोबरमध्ये तब्बल २.५ अब्ज युरो कच्चे तेल खरेदी करण्यासाठी खर्च केले. तसेच, सप्टेंबरमध्येही भारताने रशियाकडून इतकेच तेल खरेदी केले होते. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर अर्थात CREA यांच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यामुळे एक लक्षात आले की, आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत अंशतः रशियावर अवलंबून आहे.
हेही वाचा : Russian Oil Trade India Update: ट्रम्पच्या निर्बंधांमुळे भारताचा मोठा निर्णय! रशियाकडून भारताने…
फेब्रुवारी २०२२ पासून सुरू असलेल्या युद्धाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रशिया मोठ्या प्रमाणात तेल सवलती देताना दिसत आहे. यामुळे भारताला त्याचा थेट फायदा होत आहे. भारतासाठी रशियाकडून होणारा हा स्वस्त पुरवठा दिलासादायक आहे. भारताने ऑक्टोबरमध्ये रशियाकडून सुमारे ३.१ अब्ज युरो इंधन आयात केली होती. कच्च्या तेलाचा या आयातीमध्ये सर्वाधिक वाटा होता. रशियाकडून भारताने कोळसा तब्बल ३५१ दशलक्ष युरो इतका खरेदी केला आहे. तर, तेल उत्पादने २२२ दशलक्ष युरो किमतीचे खरेदी केली.
ऑक्टोबरमध्ये रशियाने सुमारे ६० दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची निर्यात केली. यामध्ये लुकोइल आणि रोझनेफ्टचा ४५ दशलक्ष बॅरल इतका वाटा आहे. CREA अहवालात भारताच्या महिन्या-दर-महिन्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत ११% वाढ झाली आहे.
एकीकडे युरोपियन देश आणि अमेरिकाने आयात घटवली असता, दुसरीकडे जपानने रशियन तेल-आधारित उत्पादनांची आयात १४०% ने वाढवली आहे. रशियन कच्च्या तेलापासून बनवलेल्या उत्पादनांवर काही देशांनी अद्याप निर्बंध जाहीर केलेले नाहीत.