नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानही उद्या होत आहे. या निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांची धावपळ सुरु आहे. असे असतानाच देशातील हिंदू नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या मोहम्मद सोहेल ऊर्फ मौलवी अबुबकर टीमोल याला सुरत शाखेच्या कठोर परिसरातून अटक करण्यात आली आहे.
सोहेव अबुबकर हा भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा, भाजप आमदार टी. राजा सिंह, हिंदुत्ववादी नेते उपदेश राणा यांच्या हत्येचा कट रचत होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, देशातील अनेक बड्या हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला सुरत पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर देशातील अनेक बडे हिंदू नेते हत्येची योजना आखत होते आणि अनेक देशांतून प्राणघातक शस्त्रे मागवत असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, हा आरोपी पाकिस्तान आणि बांगलादेशातील अनेक लोकांच्या संपर्कात होता. त्यानंतर तो हत्येचा कट रचत होता. मौलवीच्या मोबाईल चॅटमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी, मौलवीचा पाकिस्तान, नेपाळसह अनेक देशांमध्ये राहणाऱ्या कट्टरपंथीयांशई संपर्क होता.