धर्मशाला: संपूर्ण देश मान्सूनने व्यापला आहे. देशातील अनेक राज्यात तूफान पाऊस सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे सगळीकडे पाणीच पानी पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या पुरामुळे 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत.
हिमाचल प्रदेशबरोबरच जम्मू काश्मीरच्या राजौरी, डोडा, कठूआ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने आणि ढगफुटी झाल्याने 2 लहान मुले आणि 3 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने 25 जूनपासून 1 जुलैपर्यंत हिमचल प्रदेश आणि अन्य राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
29 जुनसाठी हवामान विभागाने हिमाचल प्रदेशसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बिलासपुर, सिमला, चंबा, कुल्लू आणि मंडी या जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 26 आणि 27 जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. 29 आणि 30 जूनला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जब जीवा नाला में बादल फटने से भयंकर बाढ़ आई जिसमें पत्थर, सिल्ट, लकड़ी ना जाने क्या क्या बहकर आया ।
लेकिन जोगिनी माता के इस मंदिर को कोई नुकसान नहीं हुआ।। जबकि ये बिल्कुल बीचों बीच था।।
जय माता दी।।#Kullu #HimachalWeather #HimachalPradesh pic.twitter.com/9HGhMrvnP9— Gems of Himachal (@GemsHimachal) June 27, 2025
कांगडा जिल्ह्यात 3 जणांचा मृत्यू; ‘या’ पर्यटनस्थळी ढगफुटी
हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे परीतनवर काहीसा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. सेज घाट परिसरात ढगफुटी झाली आहे. यानंतर तेथील एका नदीला पूर आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेथील पार्वती नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याचे समजते आहे.
कुल्लू प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कुल्लूमध्ये ढगफुटी झाल्यावर त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नदीचे भयानक स्वरूप यामध्ये दिसून येत आहे. हवामान विभगाने पुढील 24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
गुजरातमध्ये जोरदार पावसाचा इशारा
गुजरात राज्यात देखील प्रचंड पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरातमधील 26 जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. तर तीन जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पानी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राजस्थानमध्ये देखील पावसाचा कहर
मान्सूनने देशातील अनेक राज्ये व्यापली आहेत. राजस्थानमध्ये देखील जोरदार पावसाने कहर केला आहे. राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.