हैदराबाद : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी (Revanth Reddy) हे गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री नवे म्हणून शपथ घेणार आहेत. गुरुवारी दुपारी 1:04 वाजता हैदराबादच्या विशाल एलबी स्टेडियमवर होणाऱ्या या शपथविधीस काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधीही उपस्थित राहणार आहेत.
रेड्डी यांच्यासह किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याची माहिती अद्याप समोर आली नाही. तत्पूर्वी रेड्डी यांनी दिल्लीत सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रेवंत रेड्डी यांचे अभिनंदन केले.
मिझोराममध्ये सरकार स्थापनेसाठी वेगवान हालचाली
मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) चे नेते लालदुहोमा यांनी आज सरकार स्थापनेचा दावा केला आहे. लालदुहोमा यांनी बुधवारी सकाळी 10.30 वाजता ऐझॉल येथील राजभवनात राज्यपाल हरी बाबू कंभंपती यांची भेट घेतली. लालदुहोमा झेडपीमधून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत.