Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election : भाजप-सेनेचे अखेर ठरलं ! जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत, भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस शिल्लक असताना भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप निश्चित झाले आहे. याबाबत साटम म्हणाले, बीएमसीत भाजपा, शिवसेना, आरपीआयची महायुतीची चर्चा पूर्ण झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 30, 2025 | 08:23 AM
भाजप-सेनेचे अखेर ठरलं ! जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत, भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार

भाजप-सेनेचे अखेर ठरलं ! जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत, भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व इच्छुकांचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेनेत (शिंदे गट) जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा १३७ जागा तर, एकनाथ शिंदेंची शिवेसना ९० जागांवर निवडणूक लढणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस शिल्लक असताना भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप निश्चित झाले आहे. याबाबत साटम म्हणाले, बीएमसीत भाजपा, शिवसेना, आरपीआयची महायुतीची चर्चा पूर्ण झाली आहे. यापूर्वी आमची २०७ जागांवर चर्चा पूर्ण झाली होती. आता आमची २२७ जागांवर चर्चा झाली आहे. भाजप १३७ जागा तर, शिवेसना ९० जागा लढवणार आहे. महायुतीच्या मित्रपक्षांचा यातच समावेश आहे. त्यांना भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. भाजप आणि शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेदेखील वाचा : Pune Politics : पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने सोमवारी ८७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेसने जुन्या चेहऱ्यांना संधी देताना काही नवीन नावांचाही समावेश केला आहे. जुन्या चेहऱ्यांमध्ये शीतल म्हात्रे, अजंता यादव, आशा कोपरकर यांचा समावेश आहे. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्षासोबत युती केली आहे.

150 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार : शेवाळे

आमच्यात सकारात्मक चर्चा होऊन चांगला फॉर्म्युला ठरला आहे. २२७ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवून १५० पेक्षा जास्त जागा निवडून आणणार आहोत, असा दावा माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला.

पुणे महापालिकेसाठी विविध पक्षांची तयारी

दुसरीकडे, पुणे महापालिकेच्या निवडणुका केवळ दुरंगी न होता त्या काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी होतील, असे आता दिसू लागले आहे. पक्षांच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाल्यावर काही प्रभागात बंडखोरी देखील होईल. मोठ्या शहरांमध्ये विविध विचारांचे समुदाय असतात. त्यामुळे शहरांचे राजकारण विविध रंगी असते. भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष ठळकपणे लढतीत असतातच. याखेरीज प्रादेशिक पातळीवर बस्तान बसविलेले पक्ष सुद्धा निवडणुकीत उतरतात. अशा पक्षांशी युती अथवा आघाडी करायची वेळ राष्ट्रीय पक्षांवर येते.

Web Title: The bjp will contest 137 seats and the shiv sena 90 seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 08:12 AM

Topics:  

  • BMC Election
  • Election News
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक रंगतदार ठरणार; भाजप- राष्ट्रवादीत होणार सत्तासंघर्ष
1

पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक रंगतदार ठरणार; भाजप- राष्ट्रवादीत होणार सत्तासंघर्ष

Maharashtra Politics: ‘…पर्याय नसल्याने आत्मदहन करणार’; आर्थिक परिस्थिती नसल्याने BJP ने नाकारले तिकीट
2

Maharashtra Politics: ‘…पर्याय नसल्याने आत्मदहन करणार’; आर्थिक परिस्थिती नसल्याने BJP ने नाकारले तिकीट

कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?
3

कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?

राजकीय मैदानात मराठी अभिनेत्री; लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
4

राजकीय मैदानात मराठी अभिनेत्री; लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.