Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारमध्ये महाआघाडीत राजदचाच वरचष्मा? काँग्रेसला मिळणार फक्त इतक्या जागा, कसा आहे जागावाटपाचा फॉर्म्यूला?

बिहार निवडणुकीत राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर मित्रपक्षांच्या महाआघाडीत जागावाटपावरून गोंधळ उडाला आहे.राष्ट्रीय जनता दल (राजद)  २०२० प्रमाणे १४० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 18, 2025 | 06:28 PM
बिहारमध्ये महाआघाडीत राजदचाच वरचष्मा? काँग्रेसला मिळणार फक्त इतक्या जागा, कसा आहे जागावाटपाचा फॉर्म्यूला?

बिहारमध्ये महाआघाडीत राजदचाच वरचष्मा? काँग्रेसला मिळणार फक्त इतक्या जागा, कसा आहे जागावाटपाचा फॉर्म्यूला?

Follow Us
Close
Follow Us:

बिहारमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान निवडणुकांआधी राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर मित्रपक्षांच्या महाआघाडीत जागावाटपावरून गोंधळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.राष्ट्रीय जनता दल (राजद)  २०२० प्रमाणे सुमारे १४० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. कॉंग्रेसने गेल्यावेळी ७० जागा लढवल्या होत्या. मात्र आता फक्त ५०-५५ जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे.

Tej Pratap Yadav: मोठी बातमी! राष्ट्रीय जनता दलात मोठा भूकंप; कुटुंबात मोठी फूट पडणार

राजद पुन्हा सर्वात मोठा पक्ष बनण्याची रणनीतीवर आखत आहे, तर काँग्रेसला मागील पराभवाची किंमत मोजावी लागणार आहे. कॉंग्रेसला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. स्ट्राइक रेटच्या आधारे राजद काँग्रेसच्या जागा कमी करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची माहिती आहे.

२०२० च्या निवडणुकीत कोणी किती जागा लढवल्या

राजद : १४४ जागांवर निवडणूक लढवली, ७५ जागांवर विजय
काँग्रेस: ७० जागांवर निवडणूक लढवली,, फक्त १९ जागा जिंकता आल्या
माकप (एमएल): १९ पैकी १२ जागा जिंकल्या
माकप आणि माकप (एम): अनुक्रमे ६ आणि ४ जागा लढल्या

राजदच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, आता विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) आणि पासवान गटाचा राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (आरएलजेपी) सारखे नवीन पक्षही महागठबंधनात सामील झाले आहेत, त्यांनाही जागा द्याव्या लागतील. त्यामुळे काँग्रेसला समाधान इतक्याच जागांवर समाधान मानावं लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसला किती जागा मिळू शकतात?

राजदच्या सूत्रांनुसार, काँग्रेस ७० जागांच्या मागणीवर ठाम असली तरी ५५-६० च्या आसपास जागांवर सहमती दर्शवेल. पहिल्या रिपोर्टमध्ये कॉंग्रेसला ४० जागा मिळतील असं वृत्त होतं. तरीही इतक्याच जागा मिळतील.२०२० मध्ये सर्वात मोठा पक्ष बनल्यानंतर आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढल्यानंतर, राजदचा आत्मविश्वास वाढला आहे. यावेळी १३५-१४० जागांवर निवडणूक लढवून बहुमताच्या जवळ पोहोचू शकतो असे पक्षाचे म्हणणे आहे.

भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार! १५ ऑगस्टनंतर होऊ शकते घोषणा; ही ४ नावे शर्यतीत, सर्वात वरच्या व्यक्तीचं नाव वाचून बसेल धक्का

मित्र पक्षांना किती जागा मिळणार?

व्हीआयपी (मुकेश साहनी): ६० जागांची मागणी, पण फक्त १२ जागा मिळण्याची शक्यता.

आरएलजेपी (पशुपती पारस): २-३ जागा मिळण्याची शक्यता

सीमांचल प्रदेशात मर्यादित फायदा असूनही, एआयएमआयएमला युतीत समाविष्ट केल्याने बिहारच्या उर्वरित भागात आरजेडीला नुकसान होण्याची भीती आहे. २०२० मध्ये एआयएमआयएमने ५ जागा जिंकल्या होत्या, परंतु नंतर त्यांचे ४ आमदार आरजेडीमध्ये सामील झाले होते. दरम्यान आतापासूनच जागावाटपाचाही मुद्दा तापू लागला असून कोणाला किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Congress likely satisfied 55 to 60 seats and rjd contest 140 seats mahagathbandhan seats share in bihar elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • Bihar Election
  • Congress
  • RJD

संबंधित बातम्या

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा सज्ज; भाजप, काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये संघर्ष
1

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा सज्ज; भाजप, काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये संघर्ष

Bihar Election Result 2025: बिहारमध्ये मतमोजणी किती वाजता होणार सुरु? कुठे पाहता येईल LIVE निकाल? संपूर्ण माहिती घ्या जाणून
2

Bihar Election Result 2025: बिहारमध्ये मतमोजणी किती वाजता होणार सुरु? कुठे पाहता येईल LIVE निकाल? संपूर्ण माहिती घ्या जाणून

अजित पवार सत्तेसाठी लाचार, सत्ता सोडून ते राहू शकत नाहीत; हर्षवर्धन सपकाळांची टीका
3

अजित पवार सत्तेसाठी लाचार, सत्ता सोडून ते राहू शकत नाहीत; हर्षवर्धन सपकाळांची टीका

राजकीय वातावरण तापलं, पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; उमेदवारीसाठी फिल्डिंग
4

राजकीय वातावरण तापलं, पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; उमेदवारीसाठी फिल्डिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.