Rahul Gandhi pays tribute to Chhatrapati Shivaji on his birth anniversary
नवी दिल्ली : राज्यासह देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन नेत्यांनी छत्रपती शिवरायांच्या शौर्याला नमन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 395 वी जयंती साजरी केली जात आहे. देशातील नेत्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची पोस्ट करताना घोडचूक केली आहे.
कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यांची ही पोस्ट भरकटली आहे. जयंतीदिनी त्यांनी शिवरायांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील, अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना त्यांनी श्रद्धांजली वाहिल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी।
उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा। pic.twitter.com/1jOCYOkrC1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिवजयंतीनिमित्त खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मराठी भाषेतून खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा वाहिल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी… pic.twitter.com/zu0vLviiPf
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2025