Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही तुमचे चारित्र्य दाखवून दिले; राहुल गांधींची जात विचारणाऱ्या भाजपला सुप्रिया श्रीनेत यांची चपराक

मंगळवारी लोकसभेत भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात जोरदार वादावादी झाली. चक्रव्यूहबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांनी जातीचा उल्लेख केला. जातीचा उल्लेख होताच लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. तर जातीय जनगणना नक्की करून दाखवणारच, असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 31, 2024 | 10:56 AM
तुम्ही तुमचे चारित्र्य दाखवून दिले; राहुल गांधींची जात विचारणाऱ्या भाजपला सुप्रिया श्रीनेत यांची चपराक
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली:  जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून लोकसभेत मंगळवारी (30 जुलै)  भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.  जातीय जनगणेच्या मुद्द्यावरून बोलत असताना, भाजप खासदार अनुराग ठाकूर  यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधीं यांच्यावर निशाणा साधला. ज्यांच्या जातीचा पत्तामंगळवारी लोकसभेत भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात जोरदार वादावादी झाली. चक्रव्यूहबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांनी जातीचा उल्लेख केला. जातीचा उल्लेख होताच लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. राहुल गांधी म्हणाले की, जातीची जनगणना नक्कीच केली जाईल. नाही तेच जातीय जनगणेनेवर बोलत आहेत, अशी टीकाही केली. राहुल गांधींवरील या टीकेनंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती.

अनुराग ठाकूर यांच्या या टीकेला  काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीदेखील सडेतोड उत्तर दिले आहे. “अनुराग ठाकूर यांना राहुल गांधींची जात जाणून घ्यायची असेल तर ते स्वतः जाऊन जनतेला विचारू शकतात. मला तुमची जात जाणून घेण्यात अजिबात रस नाही, पण तुम्ही, प्रक्षोभक भाषणे देऊन आणि सभागृहात राहुल गांधींची जात विचारून तुमचे चारित्र्य पुन्हा दाखवून देत आहात. कारण तुमच्या पक्षात यासाठी तुमचा उपयोग केला जात आहे. अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.

ट्विट करत सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे की, ‘”तुम्हाला राहुल गांधींची जात जाणून घ्यायची आहे? या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कोणाचे पणजोबा साडेनऊ वर्षे तुरुंगात राहिले? कोणाच्या आजोबांनी या देशासाठी बलिदान दिले? कोणाचे आजी आणि वडील या देशासाठी शहीद झाले?”   एका स्त्रीने  इतके चारित्र्य हनन होऊनही या देशासाठी स्वत:चे आयुष्य समर्पित कले ती कोणाची आई आहे,  असे सवालही उपस्थित करत भाजप आणि अनुराग ठाकूर यांना सुनावले आहे.

तसेच, ‘राहुल गांधींची जात कोणाकडे जाऊन विचारायची असेल तर,  जा आणि रामशेत मोचीला विचारा, भाजी विक्रेत्या रामेश्वरला विचारा, निर्भयाच्या आईला विचारा, हाथरसच्या गुडिया (मुलीच्या)  कुटुंबाला विचारा, शहीद अग्निवीरांच्या कुटुंबाला विचारा, विचारा त्या करोडो दलित वंचितांना, आदिवासींना, मागासलेल्यांना विचारा, एक गोष्ट लक्षात ठेवा, राहुल गांधी आणि भारत आघाडीने ठरवले आहे की जात जनगणना होणारच, असे ट्विट करत सुप्रिया श्रीनेत यांनी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांना उत्तर दिले आहे.

Web Title: Congress spokesperson supriya shrinate criticized bjp over asking rahul gandhis cast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 10:55 AM

Topics:  

  • Anurag Thakur
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
2

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
3

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा
4

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.