
कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला कोर्टाचा दणका
NIA कडून दिल्ली विमानतळावर अटक
अनमोल बिष्णोई हा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणात आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपी असलेला गँगस्टर अनमोल बिश्नोईला आज (19 नोव्हेंबर) अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. अनमोल बिश्नोईला आज कोर्टात हजर करण्यात आले. दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. दरम्यान कोर्टाने अनमोल बिश्नोईला कोठडी सुनावली आहे.
आज अनमोल बिश्नोईला कोर्टात हजर करण्यात आले. अनमोलच्या जवळ दोन भारतीय पासपोर्ट आढळून आले. यामध्ये बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचे दिसून येत आहे. याच्यावर याच्या गुन्हेगारीची माहिती आणि खोली दिसून येत असल्याचा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला. या गोष्टींचा तपास करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने पोलिस कोठडीची मागणी केली.
कोर्टात सुनावणी पार पडल्यावर कोर्टाने अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अनमोल बिश्नोई 11 दिवस एनआयएच्या कोठडीत असणार आहे. आता 11 दिवसांच्या चौकशीत कोणकोणत्या गोष्टी समोर येतात ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एनआयएने त्याच्या डोक्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
अनमोल बिश्नोई अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये चौकशीला सामोरे जात आहे. पुढील कोणत्या एजन्सीला त्याची कोठडी द्यायची हे केंद्र सरकार ठरवेल. महाराष्ट्र पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेतही अनमोल हवा आहे. मुंबई पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार आहेत.
अनमोलच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई पोलिसांनी दोन प्रस्ताव पाठवले होते आणि देशभरात त्याच्याविरुद्ध अनेक खटले दाखल आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, एजन्सींना माहिती मिळाली की अमेरिका आणि कॅनडामध्ये वारंवार आपले स्थान बदलणारा अनमोल कॅनडामध्ये ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्याकडून बनावट कागदपत्रांवर बनवलेला रशियन पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याला अमेरिकेतही ताब्यात घेण्यात आले होते. एनआयएने त्याच्या डोक्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या २०२२ च्या हत्या प्रकरणातही अनमोल बिश्नोईचे नाव समोर आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी सांगितले की त्यांना अनमोलला भारतात पाठवले जात असल्याची माहिती देणारा ईमेल मिळाला आहे. झिशान म्हणाले की अनमोलला भारतात आणून त्याच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा द्यावी.
Ans: अनमोल बिश्नोईला आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात ऑर्डर युक्तिवाद करण्यात आला.
Ans: कोर्टाने अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे.