दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई (फोटो- सोशल मीडिया)
दिल्ली बॉम्ब स्फोटाचा तपास एनआयएकडे
मुंबई पोलिसांनी केली मोठी कारवाई
देशभरात अनेक ठिकाणी सुरू आहे छापेमारी
मागच्या आठवड्यात सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत भीषण स्फोट घडला. यामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आले. संपूर्ण देशभरात वेगाने तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी देखील मोठी कारवाई केली आहे.
दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपींशी संबंधित असलेल्या टिन जणांना अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी सोशल मिडियाच्या मदतीने मुख्य आरोपच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या कारवाईमुळे या घटनेच्या तपासाला वेग आला आहे.
Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी हे सोशल मिडियाच्या माध्यमातून मुख्य आरोपी दोन मुख्य आरोपी डॉ. उमर मोहम्मद आणि डॉ. मुझम्मिल यांच्यासारख्याच आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. हे तीन आरोपी सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे समोर आले आहे.
कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
लाल किल्ला परिसरामध्ये 10 नोव्हेंबर रोजी भीषण दहशतवादी स्फोट झाला. यामध्ये 15 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. यामध्ये हाय प्रोफाईल डॉक्टरांची दहशतवादी संघटना समोर आली आहे. या घटनेचा मास्टर माईंड उमर नबी असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. तसेच आत्मघाती बॉम्बस्फोटाचे समर्थन करणारा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या नेत्याने थेट या दहशतवाद्याची पाठराखण केल्याचे समोर आले आहे.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील काँग्रेस लोकसभा खासदार इम्रान मसूद यांनी राष्ट्रीय राजधानीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर मोहम्मद नबी यांचे समर्थन केले आहे. खासदाराने असा आरोपही केला आहे की सरकार अल-फलाह विद्यापीठासारख्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था जाणूनबुजून नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस खासदाराच्या या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की सरकार अल्पसंख्याकांना त्रास देत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंगळवारी उमरचा एक नवीन व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये त्याने आत्मघाती बॉम्बस्फोटांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार म्हणाले, “मी समोर आलेल्या व्हिडिओशी सहमत नाही.” मसूद म्हणाले, “असे म्हटले जात आहे की त्याने आत्मघाती हल्ल्याचे समर्थन केले. कोणत्याही परिस्थितीत इस्लाममध्ये आत्महत्या स्वीकार्य नाही; ती हराम आहे. तुम्ही निष्पाप लोकांना मारत आहात; हे इस्लाम शिकवत नाही. हे दिशाभूल झालेले लोक आहेत आणि त्यांच्या कृती इस्लामचे खरे चित्र सादर करत नाहीत आणि हा इस्लामचा मार्गही नाही.”
Ans: मागच्या आठवड्यात सोमवारी राजधानी दिल्लीत भीषण स्फोट झाला.
Ans: दिल्लीतील स्फोटात 10 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले.






