Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणी मागण्याचा बहाणा करुन तरुणीचा विनयभंग; पुणे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ठोकल्या बेड्या

शिवाजीनगर भागात ऑनलाइन वस्तू घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पाणी मागण्याचा बहाणा करुन त्याने तरुणीचा विनयभंग केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 08, 2026 | 02:41 PM
पाणी मागण्याचा बहाणा करुन तरुणीचा विनयभंग; पुणे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ठोकल्या बेड्या

पाणी मागण्याचा बहाणा करुन तरुणीचा विनयभंग; पुणे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:
  • महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ
  • पाणी मागण्याचा बहाणा करुन तरुणीचा विनयभंग
  • पुणे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ठोकल्या बेड्या
पुणे : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवाजीनगर भागात ऑनलाइन वस्तू घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पाणी मागण्याचा बहाणा करुन त्याने तरुणीचा विनयभंग केला आहे. पसार झालेल्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीधर हरीभाऊ कांबळे (वय २७, सध्या रा. शुक्रवार पेठ, मूळ रा. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर गावठाण परिसरात ६ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कांबळे हा तरुणीच्या घरी आला. तरुणीने ऑनलाइन खरेदी केली होती. वस्तू देत असताना त्याने तरुणीकडे पाणी मागितले. तरुणीने त्याला पाणी दिले. तेव्हा ‘तुम्ही खूप सुंदर दिसता’, असे कांबळे म्हणाला. कांबळेच्या वर्तनामुळे तरुणी घाबरली. तिने आरडाओरडा केला. कांबळे तेथून पसार झाला.

तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास करुन कांबळेचा मोबाइल नंबर मिळवला, तसेच परिसरातील सीसीटीव्हीवरून ताब्यात घेतले आहे. कांबळे याला पोलिसांनी अटक केली असून, सहायक निरीक्षक संतोष पाटील अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : मार्केट यार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार; धक्कादायक कारणही समोर

चुलत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग

जालना येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. चुलत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर जिल्ह्यातील नजिक पांगरी येथे घडली. पीडितेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे चुलत सासरे हे पीडितेच्या मागे गेले. ती शेतात गेली असता, सावध होऊन तिच्या मागून तिला आपल्या मिठीत घेतले. त्यानंतर ‘तु मला आवडतेस’, असे म्हणत तिला खाली पाडले आणि तिच्याशी लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडितेनं फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Pune police has arrested a delivery boy who molested a young woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

डिंभे धरणातून पाणी गळती, धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्या; वळसे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
1

डिंभे धरणातून पाणी गळती, धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्या; वळसे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्रात कायद्याचे पालन करणे ठरला गुन्हा? ‘त्या’ अधिकाऱ्यांवर FIR दाखल; जळगावचे प्रकरण काय?
2

महाराष्ट्रात कायद्याचे पालन करणे ठरला गुन्हा? ‘त्या’ अधिकाऱ्यांवर FIR दाखल; जळगावचे प्रकरण काय?

Amravati Crime: संतापजनक! ‘… म्हणून आई-वडिलांनी 16 वर्षीय मुलीचे केले टक्कल; नेमका विषय काय?
3

Amravati Crime: संतापजनक! ‘… म्हणून आई-वडिलांनी 16 वर्षीय मुलीचे केले टक्कल; नेमका विषय काय?

Sangamner Crime News: दत्तधाम आश्रमातील धक्कादायक वास्तव समोर! राजेंद्र गडगेचे २०० हून अधिक व्हिडिओ जप्त
4

Sangamner Crime News: दत्तधाम आश्रमातील धक्कादायक वास्तव समोर! राजेंद्र गडगेचे २०० हून अधिक व्हिडिओ जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.