Delhi Assembly Election: दिल्ली जिंकणाऱ्या पक्षाचे काय असणार 'विकासा'चे व्हिजन? वाचा सविस्तर
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. 5 तारखेला मतदान पार पडले. उद्या दिल्लीची सत्ता कोणाकडे जाणार निकाल येणार आहे. मात्र ही निवडणूक प्रामुख्याने भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात लढली गेली आहे. गेल्या 10 वर्षांत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने केलेल्या भ्रष्टाचार, दिल्लीमधील दारू घोटाळा आणि यमुना नदीचे दूषित पाणी, बेरोजगारी, पिण्याचे पाणी या अशा अनेक गोष्टींवर प्रचार करत निवडणूक लढवली आहे.
तर आम आदमी पक्ष आणि त्या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे भाजपच्या हुकूमशाही विरुद्ध, केंद्राकडून दिल्लीला मिळणारी वागणूक, सरकारी संस्थांचा गैरवापर अशा अनेक गोष्टींवर भाजपविरुद्ध लढत आहे. तर कॉँग्रेस पक्ष आपले अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक लढवत आहे का? असा प्रश्न एक्झिट पोल्सचे आकडे पाहून उपस्थित होतो आहे. दरम्यान उद्या कोणता पक्ष जिंकणार हे स्पष्ट होईल. मात्र जिंकणारा पक्षाचे दिल्लीसाठी विकासाचे व्हीजन कसे असेल? त्यांचा अजेंडा काय असेल आणि दिल्लीसाठी त्यांचे कार्य कशा प्रकारे असेल हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.
निवडणुकीच्या प्रचारात अनेक आश्वासने सर्वांकडून दिली गेली आहेत. दरम्यान कोणत्या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात सरकार आल्यावर काय करायचे हे सांगितले आहे. पहिल्यांदा आपण जर आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत आला तर दिल्लीच्या जनतेला त्यांनी काय आश्वासने दिली आहे, त्याचा एक आढावा घेऊयात.
आम आदमी पक्षाचा जाहीरनामा
आम आदमी पक्षाने निवडून आल्यास युवकांसाठी रोजगार, महिलांसाठी अनेक योजना, पिण्याचे पाणी अशा अनेक गोष्टी जाहीरनाम्यात मांडली आहेत.
1. महिलांना मासिक २५०० रुपये मानधन आणि जातीय जनगणना व नोकरी
2. ट्रान्सजेंडर समाजासाठी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण
3. ३०० युनिटपर्यंत मोफत वीज
4. दिल्लीच्या सर्व जनतेसाठी २५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य कव्हरेज
5. बेरोजगार तरुणांना ८ हजार ५०० रुपये स्टायपेंड
6. कुटुंबाला ५०० रुपये प्रति सिलिंडर दराने स्वयंपाकाचा गॅस
7. पेन्शन योजना
8. 24 तास वीज आणि पुरवठा देणे
जर पुन्हा दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यास अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री हे जवळपास नक्की आहे. मात्र पुन्हा आप सरकार दिल्लीत आल्यास वरील दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यवर असणार आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यास पुन्हा एकदा भाजप व त्यांच्याध्ये संघर्ष वाढू शकतो. 24 तास पाणी आणि वीज हा मुद्दा गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी सत्तेत असूनही पूर्णपणे सोडवलेला नाही. तर दिल्लीतील दारू घोटाळा, प्रदूषित यमुना नदी, केंद्र आणि राज्यात योग संवाद राखणे अशा अजेंडयावर काम करावे लागणार आहे.
भाजपचा जाहीरनामा काय ?
गरजू विद्यार्थ्याना पीजी ते केजीपर्यंत मोफत शिक्षण
आप सरकारच्या कुशासन आणि भ्रष्टाचाराविरुद्ध झीरो टॉलेरेन्स धोरण तयार करून एसआयटी स्थापन केली जाईल.
ऑटो आणि कॅब चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ
ज्येष्ठ नागरिकांना 2 ते अडीच हजार पेन्शन
७० वर्षांवरील व्यक्ती, विधवा आणि अपंगांना ३,००० रुपये मिळणार
महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये
घरगुती सिलेंडरवर 500 रुपये सबसीडी देण्याचे वचन
गर्भवती महिलांना २१,००० रुपये एकरकमी देण्याचे वचन
तरुणांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत
भाजपने सत्तेत आल्यास समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे वचन दिले आहे. भाजपची सत्ता आल्यास त्यांना ही वचने पूर्ण करावीच लागतील. तसेच प्रचारात त्यांनी दिल्लीतील दारू घोटाळा बाहेर काढण्याचे, किंवा त्यावर कडक उपाययोजना करण्याचे, यमुना नदीला प्रदूषणातून मुक्त करण्याचे काम करावे लागेल. म्हणजेच भाजपने दिल्लीची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला होता. ती प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपला काम करावे लागणार आहे.