Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Assembly Elections: भाजपच्या ‘मिशन दिल्ली’साठी RSSचा मेगाप्लॅन; अशी आहे रणनीती?

हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आरएसएसने अशीच रणनीती अवलंबली होती. ही रणनीती त्या निवडणुकीत बऱ्यापैकी यशस्वी ठरली. आता दिल्लीतही असेच प्रयोग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 02, 2025 | 04:52 PM
Delhi Assembly Elections: भाजपच्या ‘मिशन दिल्ली’साठी RSSचा मेगाप्लॅन; अशी आहे रणनीती?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए सरकारने दणदणीत विजय मिळवला.  त्यांच्या या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा सहभाग होता. आरएसएसने ग्राऊंड लेव्हलवर केलेल्या प्रचारामुळेच भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.आरएसएसच्या रणनीतीमुळेचभाजपने आपला विजय निश्चित केला. त्यानंतर आता दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही आरएसएस दिल्लीत सक्रीय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी आरएसएस  दिल्लीत सक्रीय होणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर लोकांना जागृत करण्यासाठी आणि राष्ट्रवादी सरकारच्या स्थापनेसाठी मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी संघ संपूर्ण दिल्लीत हजारो लहान-मोठ्या सभा घेणार आहे. विशेष म्हणजे संघाने त्यादृष्टीने पहिले पाऊलही टाकले आहे.  दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीसीठी संघ आणि भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाल्याची बातमी आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सक्रिय झाला आहे. दिल्लीत भाजपचा मार्ग सुकर व्हावा यासाठी संघाने एक मेगा प्लॅन तयार केला आहे.

Big Breaking: बांगलादेशींविरुद्ध महाराष्ट्र ATS ॲक्शन मोडमध्ये; ‘या’ शहरांमधून 17 जणांना

हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आरएसएसने अशीच रणनीती अवलंबली होती. ही रणनीती त्या निवडणुकीत बऱ्यापैकी यशस्वी ठरली. आता दिल्लीतही असेच प्रयोग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरएसएस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत या उपक्रमाचा रोडमॅप ठरविण्यात आला आहे.

कशी आहे आरएसएसची खास रणनीती

दिल्लीत स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली आहे. याअंतर्गत थेट मुख्य संस्थेसमोर येण्याऐवजी सहायक संघटनांशी संबंधित अधिकाऱ्यांना छोट्या बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा बैठकांचे आयोजनही सुरू झाले आहे. या बैठकांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील लोकांना बोलावून त्यांच्याशी सामाजिक महत्त्वाच्या तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे.

आरएसएसच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या बैठकांमध्ये कोणत्याही गट किंवा पक्षावर चर्चा केली जात नाही, उलट मतदान करण्यापूर्वी राष्ट्रीय आणि सामाजिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवावे, असे या बैठकीत सांगितले जात आहे.

प्रेमीयुगुलांना कॅफेत आडोशाची जागा करून देताय? मग सावधान; पोलीस ॲक्शन मोडमध्ये,

दिल्ली निवडणुकीबाबत आरएसएसचा मेगा प्लान

या अंतर्गत RSS दिल्लीत 1.5 लाख लहान सेमिनार आयोजित करेल, प्रत्येक बूथमध्ये 10 पेक्षा जास्त सेमिनार आयोजित करण्याची योजना आहे. देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत तळ ठोकतील आणि दिल्लीतील सर्व 13033 बूथला भेट देतील आणि घरोघरी संपर्क साधतील. एवढेच नाही तर आरएसएसचे कार्यकर्ते साडेपाच लाख घरांना भेटी देऊन राष्ट्रवादी सरकारची गरज समजावून सांगणार आहेत.

एवढेच नाही तर संघाचे तळागाळातील कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देत आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांना कोणत्या विभागाच्या सभांमध्ये कोणते मुद्दे मांडायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. येणारे सर्व RSS कॅडर मतदानाच्या दिवसापर्यंत सक्रिय राहतील.

Web Title: Delhi assembly election rsss mega plan for bjps mission delhi this is the strategy nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 04:50 PM

Topics:  

  • aam adami party
  • BJP
  • Congress
  • RSS

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.