Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अखेर जामीन मंजूर; 17 महिन्यानंतर येणार तुरुंगाबाहेर

मद्य धोरण प्रकरणात नाव आल्यानंतर मनीष सिसोदिया हे गेल्या 17 महिन्यांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. असे असताना आता ते तब्बल 17 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता त्यांना जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने त्यांना 10 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 09, 2024 | 11:23 AM
मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर

मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. असे असताना त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेत दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर केला आहे.

हेदेखील वाचा : शिवस्वराज्य यात्रेमध्ये अपघात; जयंत पाटील व अमोल कोल्हे थोडक्यात बचावले

गेल्या काही महिन्यांपासून सिसोदिया हे तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. जामीन मिळावा यासाठी त्यांनी यापूर्वी अनेकदा अर्ज केला होता. मात्र, त्यांना अद्याप जामीन मिळालेला नव्हता. असे असताना गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांना सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. या सर्व घडामोडीनंतर आज पुन्हा एकदा त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता त्यांना जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने त्यांना 10 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, मद्य धोरण प्रकरणात नाव आल्यानंतर मनीष सिसोदिया हे गेल्या 17 महिन्यांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. असे असताना आता ते तब्बल 17 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर येणार आहेत.

सिसोदिया 17 महिन्यांपासून तुरुंगात

सिसोदिया हे 17 महिन्यांपासून तुरुंगात आहेत आणि त्यांनी वेळोवेळी जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यांना जामीन मिळत नव्हता. ऑक्टोबर 2023 पासून तपासात कोणतीही प्रगती झाली नसल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निकालात सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला होता. पण आता मात्र त्यांना जामीन मंजूर केला आहे.

पासपोर्ट जमा करण्याचेही निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना जामीन दिला आहे. पण त्यांना जामीन देताना काही अटी ठेवल्या आहेत. मनीष सिसोदिया यांना त्यांचा पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दर सोमवारी त्यांना पोलीस ठाण्यात साक्ष द्यावी लागणार आहे. यासोबतच साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू नये, असेदेखील न्यायालयाने सांगितले आहे. सिसोदिया यांना जामीन मंजूर झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

हेदेखील वाचा : तू एक अप्रतिम ऍथलीट; पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींकडून नीरज चोप्राचे अभिनंदन

Web Title: Delhi former dcm manish sisodia finally granted bail nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 11:14 AM

Topics:  

  • Delhi news
  • Manish Sisodia

संबंधित बातम्या

Jarange Patil in Delhi : मनोज जरांगे पाटलांनी दिला ‘दिल्ली चलो’चा नारा; मराठा समाजाचा आवाज राजधानीत घुमणार
1

Jarange Patil in Delhi : मनोज जरांगे पाटलांनी दिला ‘दिल्ली चलो’चा नारा; मराठा समाजाचा आवाज राजधानीत घुमणार

दिल्लीच्या अनेक भागात पूर परिस्थिती; यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, जनजीवन विस्कळीत
2

दिल्लीच्या अनेक भागात पूर परिस्थिती; यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, जनजीवन विस्कळीत

परदेशी पाहुण्यांनी साफ केला कचरा; दिल्लीतील अस्वच्छतेची पोलखोल, शरमेने भारतीयांची मान खाली
3

परदेशी पाहुण्यांनी साफ केला कचरा; दिल्लीतील अस्वच्छतेची पोलखोल, शरमेने भारतीयांची मान खाली

Delhi Rain News: प्रचंड पावसाने ‘राजधानी’ तुंबली; अनेक ठिकाणी पाणी साचल्याने…;
4

Delhi Rain News: प्रचंड पावसाने ‘राजधानी’ तुंबली; अनेक ठिकाणी पाणी साचल्याने…;

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.