Photo Credit :Team Navrashtra
नवी दिल्ली : भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले. गुरुवारी (08 ऑगस्ट) रात्री झालेल्या भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरजने दुसरे स्थान पटकावले. नीरजने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर फेक करून सुवर्णपदक पटकावले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत त्यांनी नीरजचे अभिनंदन केले आहे. ” नीरज, तू एक अप्रतिम ऍथलीट आहेस. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तुमच्या चमकदार कामगिरीतूव रौप्य पदक जिंकण्यासाठी तुमचे अभिनंदन. तुम्ही पुन्हा एकदा भारताचा गौरव केला आहे.” अशा शब्दांत राहुल गांधींनी शुभेच्छा देत नीरज चोप्राला शुभेच्छा दिल्या आहेत.
Neeraj, you’re an amazing athlete.
Congratulations on your Silver medal🥈after a spectacular performance throughout #ParisOlympics2024.
You’ve made India immensely proud yet again 🇮🇳 pic.twitter.com/213S8qkzOy
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 9, 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले. सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान मोंदींनी नीरज चोप्राला शुभेच्छा दिल्या, “नीरज चोप्रा हे उत्कृष्टतेचे खरे उदाहरण! त्यांनी आपली प्रतिभा वेळोवेळी दाखवली आहे. त्यांना पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये यश मिळाल्याचा भारताला आनंद आहे. रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ते असंख्य आगामी खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशाला अभिमानास्पद करण्यासाठी प्रेरणा देत राहतील,” असे पंतप्रधान मोदींनी लिहीले आहे.
विजयानंतर नीरज चोप्रानेही आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘जेव्हाही आपण देशासाठी पदक जिंकतो तेव्हा आपण सर्वजण आनंदी होतो. आता थ्रो सुधारण्याची वेळ आहे, उणिवा सुधारुन आम्हाला दुखापतींवर काम करावे लागेल. आम्ही बसून चर्चा करू आणि कामात सुधारणा करू.”
तसेच, स्पर्धा अप्रतिम होती. प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा दिवस असतो, आज अर्शदचा दिवस होता. टोकियो, बुडापेस्ट, आशियाई खेळांचे दिवस होते. मी माझे सर्वोत्तम दिले, परंतु काही गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष देणे आणि कार्य करणे आवश्यक आहे, असेही नीरजने यावेळी सांगितले.
Neeraj Chopra is excellence personified! Time and again he’s shown his brilliance. India is elated that he comes back with yet another Olympic success. Congratulations to him on winning the Silver. He will continue to motivate countless upcoming athletes to pursue their dreams… pic.twitter.com/XIjfeDDSeb
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2024