Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Airport fire News : उड्डाणाच्या काही क्षणांपूर्वीच विमानाला आग; २३२ प्रवाशांचा थरारक बचाव

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्विस एअरलाइन्सच्या झुरिचला जाणाऱ्या फ्लाइट LX147 च्या इंजिनला उड्डाणापूर्वी आग लागली. २३२ प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 26, 2026 | 10:57 AM
Swiss Airlines Airbus A380 Aircraft Fire at Indira International Airport Delhi Fire News

Swiss Airlines Airbus A380 Aircraft Fire at Indira International Airport Delhi Fire News

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली विमानतळावर आगीची घटना
  • स्विस एअरलाइन्सच्या विमानाला उड्डाण करताना इंजिनमध्ये आग
  • २२८ प्रवासी आणि चार लहान मुलांना वाचवले
 

Delhi Airport fire News : नवी दिल्ली : रविवारी पहाटे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात घटला आहे. स्वित्झर्लंडमधील झुरिचला जाणाऱ्या स्विस एअरलाइन्सच्या विमानाला उड्डाण करताना इंजिनमध्ये आग लागल्याची धक्कादायक बाब समोर आली. (Delhi News) उड्डाणापूर्वी ही आग लागल्याने एक मोठा विमान अपघात (Plane Accident) टळला. या आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानात २२८ प्रवासी आणि चार लहान मुले होती. या घटनेत सहा प्रवासी जखमी झाले.

मीडिया रिपोर्टनुसार, एअरबस ए३३० विमान, फ्लाइट एलएक्स १४७, पहाटे सुमारे १:०८ वाजता धावपट्टीवर उड्डाणासाठी सज्ज होते. अचानक, त्याचे एक इंजिन बंद पडले आणि त्याला आग लागली. परिस्थिती लक्षात येताच, वैमानिकाने तात्काळ उड्डाण रद्द केले आणि एक मोठी दुर्घटना टळली.

दिल्ली एयरपोर्ट पर बड़ा विमान हादसा! टेकऑफ के दौरान फेल हुआ इंजन और लग गई आग, 245 यात्री थे सवार#delhiairport #flightpic.twitter.com/enhMpchq32 — Arpit shukla ✍🏽 (@JournoArpit) April 26, 2026

आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट अन् किंकाळ्या..

या घटनेनंतर, सर्व प्रवाशांना आपत्कालीन स्लाईड्सच्या साहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानात २२८ प्रवासी आणि चार लहान मुले होती. विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, परंतु सुरक्षा यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली.

हे देखील वाचा : Raghav Chadhha वर Gen-Z नाराज! BJP मध्ये प्रवेश करताच 10 लाख जणांनी केलं Unfollow

दिल्ली विमानतळावर आणीबाणी जाहीर

घडलेल्या घटनेबाबत दिल्ली विमानतळ प्रशासनाने प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली विमानतळाने सांगितले, “आज पहाटे, दिल्ली विमानतळावरील रनवे २८/१० वर स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या फ्लाइट LX 147 (DEL-ZRH) संदर्भात संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. सर्व विहित सुरक्षा नियमावली तात्काळ लागू करण्यात आली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमानतळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही.” अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

हे देखील वाचा : पक्षांतर केल्यावरही सदस्यत्व कसे वाचते? काय सांगतो पक्षांतरबंदी कायदा आणि राघव चड्ढा यांचे भवितव्य काय?

विमान प्रवासाच्या सुरेक्षचा प्रश्न ऐरणीवर 

विमान अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एकीकडे जलद आणि सुरक्षित प्रवास म्हणून विमानसेवेकडे पाहिले जात असताना आणि लोकांचा कल वाढलेला असताना देखील विमान अपघात व दुरर्घटनेमध्ये वाढ होत आहे. मागील आठवड्यामध्ये हैदराबादहून कर्नाटकातील हुबळीला जाणाऱ्या ‘फ्लाय ९१’ या विमानाला बंगळूरुमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. ४०,००० फूट उंचीवर असताना, तांत्रिक बिघाडामुळे विमानात बिघाड झाला, ज्यामुळे प्रवासी भयभीत झाले. विमान चार तास हवेत घिरट्या घालत होते. दिल्ली विमानतळावर, लेहहून येणारे स्पाईसजेटचे विमान टॅक्सीवेकडे येत असतानाच, अकासा एअरचे विमान हैदराबादला जाण्यासाठी धावपट्टीकडे येत होते. दोन्ही विमानांच्या पंखांची टक्कर झाली. विमानतळावर विमान सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असताना, हे अपघात घडत आहेत.

Web Title: Delhi igi airport swiss airlines flight lx147 engine fire passengers evacuated delhi fire news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Delhi news
  • Fire News
  • Plane Accident

संबंधित बातम्या

रिफायनरी आगीचा निष्काळजीपणा की षडयंत्र; काम पूर्ण झालेले नसताना उद्घाटनचा घाट
1

रिफायनरी आगीचा निष्काळजीपणा की षडयंत्र; काम पूर्ण झालेले नसताना उद्घाटनचा घाट

Malaysia Fire : मध्यरात्री गाव पेटलं अन्…. मलेशियात आगीचे तांडव; एका रात्रीत २०० हून अधिक घरे जळून खाक, थरारक VIDEO
2

Malaysia Fire : मध्यरात्री गाव पेटलं अन्…. मलेशियात आगीचे तांडव; एका रात्रीत २०० हून अधिक घरे जळून खाक, थरारक VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.