Delhi India Gate closed, Taj Mahal security increased in wake of India-Pakistan war
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. पाकिस्तानने भारतावर मिसाईन आणि ड्रोन अटॅक सुरु केला आणि त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्यर दिले आहे. भारताच्या अनेक ठिकाणी पाकिस्तानने गोळीबार करण्यास सुरुवात केली मात्र भारताने प्रतित्युत्यर दिल्यानंतर आता भारताने लाहोरमध्ये कारवाई केली आहे. भारताने चार विमान नेस्तनाबूत केली आहे अशी माहिती समोर आली आहे. आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि यामध्ये असे सांगण्यात आले आहे की पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद स्फोटामुळे हादरल्याची माहिती समोर आली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु होताच भारतामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अनेक निर्णय घेतले जात आहेत. राजधानी दिल्लीच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमधील इंडिया गेट रिकामे करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच इंडिया गेटचा सर्व परिसर रिकामा करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना इंडिया गेटपासून लांब जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इंडिया गेटच्या बाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट घ्या जाणून
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील आठ आश्चर्यापैकी एक असलेले आणि भारताच्या पर्यटनातील महत्त्वपूर्ण वास्तू असलेले ताजमहाल देखील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ताजमहालच्या सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या 1971 च्या युद्धावेळी देखील ताजमहाल झाकून ठेवण्यात आला होता. यावेळी देखील ताजमहालची सुरक्षा वाढवली आहे.
भारताच्या तिन्ही दलाकडून पाकिस्तानची कोंडी
पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारतीय तिन्ही दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताच्या तिन्ही दलाकडून पाकिस्तानची कोंडी करण्यात आली आहे. LOC वर देखील गोळीबार सुरु झाला असून सीमा भागामध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. परिसरामधील लाईट, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. भारताने इस्लामाबाद, कराचीवर हल्ला करण्यात आला. कराची बंदरावर देखील भारताच्या आयएनएस विक्रांत कडून हल्ला करण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या शहरांमध्ये भारताच्या वायू दलाने हल्ला केला आहे. पाकिस्तान सेनेच्या मुख्यालयावर देखील भारताने हल्ला केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारताच्या पाठीशी अमेरिकेची ताकद
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध आता निश्चित झाले आहे. पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर भारताने देखील पाकिस्तानच्या लाहोर शहरावर ड्रोन हल्ला केला आहे. यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ताकद वाढवली आहे. एस. जयशंकर यांनी सर्व प्रमुख देशांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला आहे. तसेच त्यांचा पाठिंबा देखील मिळवला आहे. एस. जयशंकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. भारताला अमेरिका आणि इटली या देशाचा उघड पाठिंबा मिळाला आहे.