फोटो सौजन्य - X
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये वॉर सुरु झाले आहे, पाकिस्तानने मिसाईन आणि ड्रोन अटॅक सुरु केला आणि त्याला भारतीय सैन्याने चोख प्रतित्युत्यर दिले आहे. भारताच्या अनेक ठिकाणी पाकिस्तानने गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर भारताने प्रतित्युत्यर दिल्यानंतर आता भारताने लाहोरमध्ये कारवाई केली आहे. भारताने चार विमान नेस्तनाबूत केली आहे अशी माहिती समोर आली आहे. आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि यामध्ये असे सांगण्यात आले आहे की पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद स्फोटामुळे हादरल्याची माहिती समोर आली आहे.
एवढेच नव्हे तर भारताचे क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आता समोर आली आहे. तर लाहोरवर हल्ला झाल्यानंतर त्यानंतर आता इस्लामाबाद येथे देखील भारतीय सैन्याने हल्ला केला अशी माहिती आता समोर आली आहे. इस्लामाबाद येथे १० स्फोट झाले असल्याची माहितीचा खुलासा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, इस्लामाबाद, कराची आणि बहवालपूर येथे सायरनचे आवाज आल्याची बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानने क्षेपणास्त्र हल्ले करण्याचे अनेक प्रयत्न केले, जे लष्कराने हाणून पाडले. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने ४ अँटी-ड्रोन सिस्टीम सक्रिय केल्या आहेत. एल-७० संरक्षण प्रणाली, एस-४०० यासह अनेक हवाई संरक्षण प्रणालींनी पाकिस्तानी क्षेपणास्त्रे पाडली आहेत. यासोबतच अनेक ड्रोनही पाडण्यात आले आहेत.
श्रीनगर विमानतळावर हाय अलर्ट आहे. गुजरातमधील कच्छपासून भूजपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला आहे. चंदीगड आणि मोहालीमध्येही वीजपुरवठा खंडित झाला आहे. राजस्थानच्या सीमावर्ती भागातही ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. अमृतसरसह पंजाबमधील अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. जैसलमेरमध्ये पाकिस्तानने डागलेले क्षेपणास्त्र पाडण्यात आले आहे.
भारताकडून दहशतवाद्यानंतर आता पाकिस्तानी सैन्यही भारतीय आर्मीच्या टार्गेटवर असणार आहेत. पाकिस्तानचा सेनाप्रमुख असीर मुनीफ याला ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अशी माहिती समोर येत होती की असीर मुनीर याच्यावर देश्द्रोह्याचा खटला चालवला जाणार आहे अशी मोठी अपडेट समोर आली आहे.