परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिका आणि इटलीच्या देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला भारत पाकिस्तान युद्ध (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये जवळपास युद्ध निश्चित झाले आहे. पाकिस्तानकडून भारताच्या सीमा भागांमधील राज्यावर हल्ला केला. भारताने पाकची ही सर्व प्रयत्न भारतीय सेनेने हाणून पाडले आहेत. पाकिस्तानने मिसाईल डागून जम्मू काश्मीर एअरबेस, पोखरण, अशा भारतीय सैन्य दलांच्या मुख्य ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या एस- 400 या यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले हवेतल्या हवेतच परतवून लावले. मात्र त्यानंतर भारताने देखील चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. काही ठिकाणी जोरदार उत्तर दिले जात आहे. यानंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सुत्रे फिरवली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध आता निश्चित झाले आहे. पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर भारताने देखील पाकिस्तानच्या लाहोर शहरावर ड्रोन हल्ला केला आहे. यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ताकद वाढवली आहे. एस. जयशंकर यांनी सर्व प्रमुख देशांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला आहे. तसेच त्यांचा पाठिंबा देखील मिळवला आहे. एस. जयशंकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
ऑपरेशन सिंदूरबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
एस. जयशंकर यांनी त्यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. अमेरिकेसोबत चर्चा झाली असून संध्याकाळी अमेरिकेच्या @SecRubio शी बोललो. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचे मनापासून कौतुक करतो. सीमापार दहशतवादाला भारताचा लक्ष्यित आणि मोजमापित प्रतिसाद अधोरेखित केला. तणाव वाढवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कठोरपणे तोंड देऊ, असा विश्वास एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. यामुळे आता अमेरिका ही भारतासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का मानला जात आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट घ्या जाणून
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले आहे की , त्यांची इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री अँटोनियो ताजानी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. दहशतवादाचा कडकपणे सामना करण्यासाठी भारताच्या लक्ष्यित आणि मोजमाप केलेल्या प्रतिसादावर चर्चा केली. कोणत्याही वाढत्या तणावाला जोरदार प्रतिसाद मिळेल असा विश्वास इटलीने देखील भारताला पाठिंबा दिला असल्याची माहिती एस जयशंकर यांच्या अकाऊंटवरुन दिली आहे.
युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष काजा कल्लाससोबत एस जयशंकर यांच्यासोबत चालू घडामोडींवर चर्चा केली. भारताच्या कृतींमध्ये त्याचे मोजमाप झाले आहे. तथापि, कोणत्याही वाढत्या तणावाला कडक प्रत्युत्तर दिले जाईल. असे मत परराष्ट्रमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे जगभरातून भारताच्या पाठीशी इतर देशांचा पाठिंबा मिळाला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे.