
नवी दिल्ली – केंद्राने 19 मे रोजी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अध्यादेश जारी केला होता. अध्यादेशात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme court) ११ मे चा निर्णय रद्द केला, ज्यामध्ये दिल्ली सरकारला बदली-पोस्टिंगचा अधिकार मिळाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत (lok sabha) दिल्ली अध्यादेश विधेयक मांडू शकतात. त्याला 25 जुलै रोजी मोदी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार या विधेयकाला विरोध करत आहे. मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेले इंडियाचे खासदार (MP)दिल्लीला परतले. दरम्यान, आज मणिपूर हिंसाचारावर सभागृहात चर्चेची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. त्यामुळे आजही संसदेचे कामकाज गदारोळात होण्याची शक्यता आहे. तसेच दिल्ली अध्यादेश विधेयक आज किंवा उद्या मांडले जाण्याचे शक्यात आहे.
INDIA मध्ये पवारांबाबत नाराजी?
दुसरीकडे इंडियांची बैठक होत असताना आणि भाजपाच्या विरोधात विरोधक एकवटले असताना, शरद पवार मोदींबरोबर व्यासपीठ शेअर करणार असल्यामुळं तसेच शरद पवार 1 ऑगस्टला नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने INDIAच्या काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. याबाबत कॉंग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे देखील शरद पवारांशीबोलून या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी न लावण्याबाबत बोलणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, एकिकडे विरोधक एकवटले असताना, शरद पवारांनी मोदींच्या कार्यक्रमाला हजेरी लावू नये, असा सूर इंडियाच्या नेत्यांमध्ये आहे. याबाबत काही नेत्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज ९ वा दिवस
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंड केले आहे, पण हे बंड करण्यास शरद पवारांनी सांगितले असल्याची चर्चा सुरु आहे. शरद पवारांच्या राजकीय खेळी यावर राजकीय विश्लेषकांची मतमतांतरे आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे येत्या १ ऑगस्ट रोजी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करणार असून, १ तारखेला मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते मोदींना देण्यात येणार आहे. त्यामुळं ज्या राष्टवादीवर घोटाळ्याचे आरोप करणारे मोदी हा पुरस्कार पवारांच्या हातून स्विकारणार का? किंवा इंडियांची बैठक होत असताना आणि भाजपाच्या विरोधात विरोधक एकवटले असताना, शरद पवार मोदींबरोबर व्यासपीठ शेअर करणार का? असं प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पुरस्कार की राज्यसभेतील मतदान?