Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन अतुल सावे यांनी केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 26, 2026 | 01:39 PM
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Follow Us
Follow Us:
  • शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा
  • शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा
  • मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
पुणे : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता राखून योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

 

पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे २४ व २५ ऑक्टोबरदरम्यान हे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला भटके-विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्राचे अध्यक्ष उद्धव काळे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, राज्यस्तरीय अशासकीय सदस्य राजेंद्र दोनाडकर, डॉ. संजय पुरी, नरेश पोटे आणि शरद माकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अतुल सावे म्हणाले की, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. प्रशासकीय नियम व कार्यपद्धतींचे पालन करताना क्षेत्रीय स्तरावरील कामकाज अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यावर भर दिला पाहिजे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक सुसूत्रपणे करण्यास मदत होईल. या शिबिरामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अशासकीय सदस्य, विभागाचे क्षेत्रीय अधिकारी आणि महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा : एकमेकांकडे पाहिल्याचा राग अन् थेट डोक्यावर वार; पुण्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी

विभागाच्या विविध योजना, शासकीय नियम व कार्यपद्धती, प्रशासकीय जबाबदाऱ्या, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि क्षेत्रीय स्तरावरील समन्वय या विषयांवर प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन करण्यात केले आहे. महात्मा फुले यांच्या समताधिष्ठित विचारांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाशी सुसंगतपणे बहुजन समाजाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना अधिक गती देणे, हा या प्रशिक्षण शिबिराचा प्रमुख उद्देश आहे. या शिबिराचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालनालय, पुणे आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असल्याची माहिती ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी दिली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन का करण्यात आले?

    Ans: शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय समन्वय आणि योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

  • Que: या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कोणी केले?

    Ans: मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

  • Que: हे प्रशिक्षण शिबिर कुठे आणि कधी आयोजित करण्यात आले?

    Ans: पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.

Web Title: Minister atul save has made an important appeal to the administration nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Government Schemes
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

वाढलेल्या मतदानाचा कौल कुणाला? पदवीधरांत सोलापूर आघाडीवर; शिक्षकांत साताऱ्याचा सर्वाधिक प्रतिसाद
1

वाढलेल्या मतदानाचा कौल कुणाला? पदवीधरांत सोलापूर आघाडीवर; शिक्षकांत साताऱ्याचा सर्वाधिक प्रतिसाद

जिद्दीपुढे अडचणीही फिक्या! १०६ विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय Chess स्पर्धेत सहभाग; गौरव फुलसुंदर अव्वल
2

जिद्दीपुढे अडचणीही फिक्या! १०६ विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय Chess स्पर्धेत सहभाग; गौरव फुलसुंदर अव्वल

PUNE News: भाकड जनावरांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत द्या; दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यात उपोषण
3

PUNE News: भाकड जनावरांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत द्या; दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यात उपोषण

Mira Bhayandar Air Pollution: प्रदूषणाचा कहर! AQI १९२ वर; १५० बांधकामांना नोटिसा, तरी धुळीचे साम्राज्य कायम
4

Mira Bhayandar Air Pollution: प्रदूषणाचा कहर! AQI १९२ वर; १५० बांधकामांना नोटिसा, तरी धुळीचे साम्राज्य कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.