Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

Ahilyanagar News: भगवान बाबा मल्टीस्टेट गैरव्यवहार प्रकरणावरून ठेवीदार आक्रमक झाले असून, अहिल्यानगरमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या ठेवीदारांनी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 26, 2026 | 04:58 PM
‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

Follow Us
Follow Us:
  • भगवान बाबा मल्टीस्टेट गैरव्यवहार
  • सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे
  • ठेवीदारांचे अहिल्यानगरमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन
पोपट पिटेकर,अहिल्यानगर: श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील करोडो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे ठेवीदार अखेर आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील सर्व दोषी व उर्वरित आरोपींना तातडीने बेड्या ठोकण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी ठेवीदारांनी अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन जोरदार निदर्शने केली.(Ahilyanagar News)

सर्व ठेवीदारांचा एल्गार

शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर आणि अहिल्यानगर परिसरातील सुमारे ६० ते ७० पीडित ठेवीदारांनी एकत्र येत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन छेडले. सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे! ठेवीदारांना न्याय मिळालाच पाहिजे! अशी आंदोलकांनी मागणी केलीये. आपल्या कष्टाची जमापुंजी अडकल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी प्रशासनाच्या संथ कारभाराविषयी तीव्र रोष व्यक्त केला.

Fake Currency News: घरमालकाला दाखवला चाकू, अन् आत सुरू होता नोटांचा खेळ! नागपूरमधील धक्कादायक प्रकार उघड

चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी- आंदोलकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात संस्थेच्या विद्यमान चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जयशाली मयूर वैद्य यांना तात्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, जयशाली वैद्य यांच्या बहीण वैशाली योगेश गायकवाड यांच्या नावे संस्थेतून तब्बल ३० कोटी रुपयांचे कर्ज दाखवण्यात आल्याचा खळबळजनक दावा आंदोलकांनी केला आहे. या संशयास्पद व्यवहाराची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तपास अधिकाऱ्यांचे आश्वासन, आंदोलक शांत

आंदोलनाची तीव्रता पाहून आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी शिरीष देशमुख यांनी आंदोलकांशी चर्चा केली. प्रकरणातील उर्वरित सर्व आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल आणि कायदेशीर कारवाई गतीने केली जाईल असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. तपास अधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर ठेवीदारांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेतले.

प्रत्यक्ष कारवाईकडे सर्वांचे लक्ष

आंदोलन मागे घेतले असले तरी, पोलिसांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार, याकडे आता सर्व ठेवीदारांचे लक्ष लागले आहे. कष्टाचा पैसा सुरक्षित परत मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हीच सर्व पीडित ठेवीदारांची एकमेव अपेक्षा आहे. पोलीस प्रशासन यावर आता काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Nagpur News : जंगलातील संघर्षाला मिळणार नवा योद्धा ‘भीमा’ आणि ‘सुब्रमण्यम’ हत्तींची विदर्भात एन्ट्री

Web Title: Bhagwan baba multistate fraud depositors protest ahilyanagar sp office sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra
  • police

संबंधित बातम्या

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
1

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
2

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
3

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Mira Bhayandar Air Pollution: प्रदूषणाचा कहर! AQI १९२ वर; १५० बांधकामांना नोटिसा, तरी धुळीचे साम्राज्य कायम
4

Mira Bhayandar Air Pollution: प्रदूषणाचा कहर! AQI १९२ वर; १५० बांधकामांना नोटिसा, तरी धुळीचे साम्राज्य कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.