Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Herald Case: सोनिया-राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; दिल्ली कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

२०१२ मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करत काँग्रेस नेत्यांवर आर्थिक फसवणूक आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: May 02, 2025 | 03:49 PM
National Herald Case: सोनिया-राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; दिल्ली कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  नेशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवलं आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, तसेच इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांच्यासह इतर काही वरिष्ठ नेत्यांविरुद्ध राऊज अव्हेन्यू कोर्टात चार्जशीट दाखल केली होती. आता या प्रकरणी दिल्ली कोर्टाने राहुल आणि सोनिया गांधी यांना नोटिस जारी केली आहे.

नेशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज दिल्लीच राऊस अव्हेन्यू कोर्टात सुनावणी पार पडली.  या आधी २५ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने नोटिस जारी करण्यास नकार दिला होता. आजच्या सुनावणीत कोर्टाने सोनिया आणि राहुल गांधी यांना नोटिस जारी केली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे.

दिल्लीतील कोर्टाने नोटिस बजावल्यामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने ) काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, तसेच इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांच्यासह इतर काही वरिष्ठ नेत्यांविरुद्ध राऊज अव्हेन्यू कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरण नक्की काय आहे?

२०१२ मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करत काँग्रेस नेत्यांवर आर्थिक फसवणूक आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. हे प्रकरण मुख्यतः यंग इंडियन लिमिटेड (YIL) आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) या दोन कंपन्यांशी संबंधित आहे.

AJL ही कंपनी ‘नेशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राचं प्रकाशन करत होती. ही संस्था १९३८ मध्ये पंडित नेहरू आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सुरू केली होती. मात्र काळानुसार हे वृत्तपत्र बंद पडलं आणि AJL वर मोठं कर्ज झालं. २०११ मध्ये काँग्रेस पक्षाने ही जबाबदारी आपल्या खिशातून ९० कोटी रुपये देऊन उचलली आणि YIL ही कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे प्रत्येकी ३८% हिस्सा आहे.

National Herald Case : नक्की काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण? ज्याने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सॅम पित्रोदांचं वाढवलंय टेन्शन

ED च्या तपासानुसार, काँग्रेसने दिलेलं ९० कोटींचं कर्ज माफ करून त्या मोबदल्यात YIL ला AJL चे ९ कोटी शेअर्स ट्रान्सफर केले. त्यामुळे AJL वर YIL ला ९९% स्वामित्व मिळालं. महत्त्वाचं म्हणजे, AJL कडे संपूर्ण देशभरात सुमारे २,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता आहेत. म्हणजेच YIL ने अत्यल्प रकमेच्या मोबदल्यात इतकी मोठी मालमत्ता मिळवली, असा ED चा आरोप आहे. ही एक आर्थिक कट कारस्थान होतं, ज्यामध्ये ९८८ कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय आहे. यामध्ये बनावट देणग्या, जाहिरात महसूलात कृत्रिम वाढ, आणि संस्थात्मक निधीचा दुरुपयोग केल्याचे पुरावे मिळाल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे.

Web Title: Delhi rouse avenue court issue notice to rahul gandhi and sonia gandhi at national herald case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • indian politics
  • Rahul Gandhi
  • Sonia Gandhi

संबंधित बातम्या

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?
1

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Karnatak News: EVMवर जनतेचा प्रचंड विश्वास; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल
2

Karnatak News: EVMवर जनतेचा प्रचंड विश्वास; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल

भाजप सरकार कोसळणार? मुख्यमंत्री अन् मंत्र्यांमधला वाद चव्हाट्यावर; राज्य वाचवण्यासाठी दिल्लीत धावपळ
3

भाजप सरकार कोसळणार? मुख्यमंत्री अन् मंत्र्यांमधला वाद चव्हाट्यावर; राज्य वाचवण्यासाठी दिल्लीत धावपळ

Amit Shah on Rahul Gandhi: जनतेला आवडणाऱ्या कामांना विरोध करता, मग मतं कुठून मिळणार? अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला
4

Amit Shah on Rahul Gandhi: जनतेला आवडणाऱ्या कामांना विरोध करता, मग मतं कुठून मिळणार? अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.