गोगा मेडी धामला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला ट्रकची धडक, 7 जण ठार तर 8 जखमी (फोटो सौजन्य-X )
हरियाणामधील जींद जिल्ह्यातील नरवाना येथे भाविकांनी भरलेल्या वाहनाला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. अपघातातील जखमींवर नरवाना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात हिसार-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर झाला असून कुरुक्षेत्रातील मरखेडी गावातील लोक राजस्थानमधील गोगामेडी धाम येथे पूजेसाठी जात होते. हे सर्व भाविक लोक टाटा मॅजिकमध्ये प्रवास करत होते. मंगळवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हिसार-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावरून त्यांची गाडी पुढे सरकली असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली.
या अपघातानंतर घटनास्थळी सात रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. अपघातात गाडी पलटली झाल्यामुशे अनेक प्रवासी गाडीखाली अडकले होते. मात्र रस्त्यावर अंधार असल्याने त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. त्यानंतर पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथे भाविकांचे सर्व खाद्यपदार्थ विखुरलेले होते. रक्ताने माखलेले लोक वेदनेने ओरडत होते. घटनास्थळी एकामागून एक सात रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या. लोकांनी तात्काळ नरवाना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेथे डॉक्टरांनी सात जणांना मृत घोषित केले. तर उर्वरित जखमींना उपचारासाठी हिसार येथील अग्रोहा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले.
अपघाताची माहिती मिळतातच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. कुरुक्षेत्रातील मार्चखेडी गावातील सुमारे 15 लोकांनी कराजस्थानमधील गोगामेडी धाम येथे पूजेसाठी कारमधून जात होते. रात्री 12.30 च्या सुमारास ते नरवणातील बिरधना गावाजवळ आले असता, मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली, त्यामुळे गाडी खड्ड्यात पडून पलटी झाली. या अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्यांनी कारमधील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि नरवाना पोलिस स्टेशन सदर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
हे सुद्धा वाचा: मोठी दुर्घटना! वैष्णोदेवीच्या मार्गावर दरड कोसळली; दोन यात्रेकरु ठार, प्रवासावर तात्पुरती बंदी
अपघाताच्या घटनास्थळी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी नरवाना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी आठ जणांना मृत घोषित केले तर उर्वरित जखमींना अग्रोहा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. रुक्मिणी (50), कामिनी (35), तेजपाल (55), सुरेश (50), परमजीत (50), मुक्ती (50) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची ओळख पटलेली नाही. या घटनेतील ट्रक जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.