दुचाकी दुभाजकाला धडकून युवकाचा मृत्यू (संग्रहित फोटो)
कराड : कराड-ढेबेवाडी मार्गावर आगाशिवनगर-मलकापूर येथील पंचरत्न पार्कसमोर दुचाकी दुभाजकाला धडकून तरुणाचा मृत्यू झाला. रस्त्यात आडवे आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास झाला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाचा मृत्यू झाल्याने एकच चर्चा सुरु आहेत.
इंद्रजीत अधिकराव कणसे (वय 36, रा. दत्तशिवम कॉलनी, आगाशिवनगर, मूळ रा. मालदन-पानवळवाडी, ता. पाटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मलकापूर येथील दत्तशिवम कॉलनीत राहणारा इंद्रजीत कणसे हा युवक मंगळवारी दुपारी कराड-ढेबेवाडी मार्गावरून चचेगाव या ठिकाणी गेला होता. तेथून परत येत असताना पंचरत्न पार्क इमारतीसमोर अचानक कुत्रे आडवे आल्यामुळे इंद्रजितने दुचाकीचा ब्रेक लावला. मात्र, दुचाकी दुभाजकावर आदळल्याने इंद्रजितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
हेदेखील वाचा : KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले. कराड शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.
मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये भीषण अपघात
मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका बसने दुर्गा मताच्या मंडपाला धडक दिली. या अपघातात 20 हून अधिक लोक जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींचा उपचार रुग्णालयात सुरु आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरच्या सिहोरा भागात ही घटना घडली आहे.
हेदेखील वाचा : नेपाळमध्ये भीषण रस्ता अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली अन्…; २ जणांचा मृत्यू
अभिनेत्री रुपाली भोसले यांच्या कारला अपघात
अभिनेत्री रुपाली भोसले सध्या लपंडाव या मालिकेत काम करताना दिसत आहे, या मालिकेमध्ये अभिनेत्री सरकार ही खलनायिकेची भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच रुपाली भोसले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. रुपालीने नुकत्याच खरेदी केलेल्या लक्झरी कारचा अपघात झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे रुपालीने काही दिवसांआधीच ही कार खरेदी केली होती ज्याची माहिती तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली.