Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशाच्या सरन्यायाधीशपदी धनंजय चंद्रचूड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती चंद्रचूड यांना शपथ दिली. पुढची दोन वर्षे ते या पदावर राहणार आहेत.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 09, 2022 | 11:15 AM
देशाच्या सरन्यायाधीशपदी धनंजय चंद्रचूड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी आज भारताचे ५० वे सरन्यायाधीश (Chief Justice Of India) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) न्यायमूर्ती चंद्रचूड यांना शपथ दिली. पुढची दोन वर्षे ते या पदावर राहणार आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड १९७८ ते १९८५ या काळात भारताचे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड तब्बल सात वर्षे चार महिने इतका सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदावर राहिले.

पुण्यातील (Pune) कन्हेरसर हे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे मूळ गाव आहे. न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड हे न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची जागा घेतील. न्यायमूर्ती उदय ललित यांनी ११ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून १९९८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ते २९ मार्च २००० ते ३१ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड हे घटनापीठाचा भाग आहेत. त्यानंतर त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली.

ऐतिहासिक निकाल देणार्‍या अनेक घटनापीठांसह सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिले आहेत. यामध्ये अयोध्या वाद, आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, शबरीमाला प्रकरण, भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार देणे आदी निर्णयांचा समावेश आहे.

Web Title: Dhananjay chandrachud president draupadi murmu took oath as the chief justice of the country nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2022 | 11:15 AM

Topics:  

  • Chief Justice of India
  • Mumbai High Court
  • President draupadi murmu
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात लग्न जमवण्याचा प्रकार पडला महागात; २६ लाख ५० हजारला घातला गंडा
1

Pune Crime: पुण्यात लग्न जमवण्याचा प्रकार पडला महागात; २६ लाख ५० हजारला घातला गंडा

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral
2

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात होणार नाहीत निवडणुका; उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती
3

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात होणार नाहीत निवडणुका; उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात
4

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.