Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणातील कथित अनियमिततेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Oct 09, 2026 | 06:11 PM
INDIA Bloc protest (1)

INDIA Bloc protest (1)

Follow Us
Follow Us:
  • इंडिया आघाडीचे नेते राष्ट्रपती मुर्मू यांची घेणार भेट
  • राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि ममता बॅनर्जी यांच्यासह दहा सदस्यांचे शिष्टमंडळ
  • मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेतीवरून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
 

मागील 3 दिवसांपासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राजधानीत जोरदार आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 6, 7 आणि 8 ऑकटोबर रोजी दिल्लीत आंदोलन पार पडले. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका यावेळी विरोधी पक्षाकडून घेण्यात आली. अश्यातच आता या मागणीसाठी इंडिया आघाडीचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.

मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनादरम्यान विरोधकांनी घेतली.

इंडिया आघाडीचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार

आंदोलनानंतर आता इंडिया आघाडीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या कार्यालयाने शुक्रवारी सकाळी या भेटीसाठी रात्री ८ वाजताची वेळ निश्चित केली.

Abhijeet Dipke Criticized Central Govt. : एवढी भिती वाटत असेल तर आख्खा देश बंद करा…; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्ला

या शिष्टमंडळात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह एकूण दहा सदस्यांचा समावेश असणार आहे.

या भेटीदरम्यान मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रपतींसमोर मांडली जाण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रपतींना भेटण्याआधी खासदार सेंट्रल हॉलमध्ये जमणार

इंडिया आघाडीच्या खासदारांचा आजचा कार्यक्रमही निश्चित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व खासदार शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एकत्र जमणार आहेत. त्यानंतर रात्री ८ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.

राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग येणार?

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर विरोधकांनी आता राष्ट्रपतींच्या भेटीच्या माध्यमातून आपली मागणी पुढे नेण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या भेटीत इंडिया आघाडीचे नेते नेमकी कोणती भूमिका मांडतात आणि त्यानंतर काय घडामोडी होतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि एसआयआर प्रक्रियेवरील आक्षेप यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या (10 ऑकटोबर) जंतर मंतर येथे होणाऱ्या CJP च्या आंदोलनावरूनदेखील राजधानीतील वातावरण आणखी गरम होण्याची शक्यता आहे.

Railways Cancel Express Trains: केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक! सीजेपीच्या आंदोलनापूर्वी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंडिया आघाडीचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट का घेणार आहेत?

    Ans: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

  • Que: राष्ट्रपतींच्या भेटीला कोणते प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत?

    Ans: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह एकूण दहा सदस्यांच्या शिष्टमंडळाचा या भेटीत समावेश असेल.

  • Que: विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी का केली आहे?

    Ans: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीने दिल्लीत आंदोलन केले आहे.

Web Title: India alliance meeting prez murmu gyanesh kumar resignation rahul gandhi vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Gyanesh Kumar
  • INDIA Alliance
  • Mamata Banerjee
  • President draupadi murmu
  • Rahul Gandhi
  • SIR

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke Criticized Central Govt. : एवढी भिती वाटत असेल तर आख्खा देश बंद करा…; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्ला
1

Abhijeet Dipke Criticized Central Govt. : एवढी भिती वाटत असेल तर आख्खा देश बंद करा…; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्ला

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
2

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
3

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
4

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.