Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

द्रमुक नेते ए. राजा बरळले ! भारत माता व सनातन धर्माबाबत केले वादग्रस्त विधान

माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुक पक्षाचे नेते ए. राजा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ए. राजा यांनी भारत माता व सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 05, 2024 | 03:32 PM
द्रमुक नेते ए. राजा बरळले ! भारत माता व सनातन धर्माबाबत केले वादग्रस्त विधान
Follow Us
Follow Us:

माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुक पक्षाचे नेते ए. राजा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ए. राजा यांनी भारत माता व सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. यापूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र आणि राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी अनेकांच्या भावना दुखावतील असे विधान केले होते. त्यानंतर आता ए. राजा यांनी संतापजनक वक्तव्य केले असून भारत कधीच एक राष्ट्र नव्हतं. भारत एक राष्ट्र नव्हे तर हा एक उपखंड आहे. असे ए. राजा म्हणाले आहेत.

आम्ही सर्वजण रामाचे शत्रू आहोत

ए. राजा यांनी वादग्रस्त विधान करताना हनुमानाची वानराशी तुलना केली. तसेच ‘जय श्रीराम’ हा नारा घृणास्पद असल्याचं वक्तव्य केलं. ए. राजा म्हणाले, “तुम्ही (सनातनवादी, हिंदुत्ववादी) म्हणत असाल की, अमूक एक तुमचा देव आहे आणि तुम्ही इतरांना ‘भारत माता की जय’ बोलायला सांगत असाल तर आम्ही तुमचा ईश्वर मानत नाही. तसेच तुमच्या भारतमातेचा आम्ही स्वीकार करत नाही. त्यांना सांगा आम्ही सर्वजण रामाचे शत्रू आहोत. माझा रामायणावर आणि रामावर विश्वास नाही.” असे देखील ए. राजा म्हणाले आहेत.

भारत एक राष्ट्र नाही तर एक उपखंड

त्याचबरोबर भारत हा एक राष्ट्र कधीच नव्हता असे देखील ए. राजा म्हणाले. “भारत कधीच एक राष्ट्र नव्हतं. एका राष्ट्राचा अर्थ होतो, एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती. तेव्हा ते एक राष्ट्र असतं. परंतु, भारत एक राष्ट्र नाही. भारत एक उपखंड आहे. भारत हा एक उपखंड असल्याचं वाक्य रेटताना ए. राजा म्हणाले, इथे तमिळ हे एक राष्ट्र म्हणजेच एक देश आहे. मल्याळम एक भाषा, एक राष्ट्र, एक देश आहे. उडिया एक भाषा, एक राष्ट्र आणि एक देश आहे. अशी सगळी राष्ट्रं मिळून भारत हा मोठा उपखंड तयार होतो. त्यामुळे भारत हा देश नसून एक उपखंड आहे.” असे विधान ए. राजा यांनी केला आहे.

विविधतेत एकता असूनही आपल्यामध्ये मतभेद आहेत

“या उपखंडात वेगवेगळ्या भाषा, परंपरा आणि संस्कृती आहेत. तुम्ही तमिळनाडूला आलात तर तिथली वेगळी संस्कृती तुम्हाला पाहायला मिळेल. केरळमधील संस्कृती वेगळी आहे. दिल्लीत वेगळी संस्कृती आहे. ओडिशात वेगळी संस्कृती आहे. काश्मीरमध्ये एक वेगळी संस्कृती आहे, तुम्ही त्या संस्कृतींचा स्वीकार करा. मणिपूरमधील लोक श्वानाचं (कुत्रा) मांस खातात. तुम्ही ती गोष्टदेखील स्वीकारली पाहिजे. एखादा समाज गोमांस खात असेल तर त्यात तुम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही. त्या लोकांनी तुम्हाला गोमांस खायला सांगितलं आहे का? त्यामुळेच विविधतेत एकता असूनही आपल्यामध्ये मतभेद आहेत. परंतु, तुम्ही ते मतभेद स्वीकारले पाहिजेत,” असे ए. राजा म्हणाले आहेत.

Web Title: Dmk leader a raja has made a controversial statement about bharat mata and sanatan dharma nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2024 | 03:32 PM

Topics:  

  • Lord Ram
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.