
For the local body elections, the BJP did not give nominations to its loyalists
नांदेड : २९ नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न भाजपातील अंतर्गत असंतोष उघड झाला असून, तिकीट नाकारलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाला थेट राजकीय धक्के देण्यास सुरुवात केली आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्यांना डावलून काँग्रेस व अन्य पक्षांतून आलेल्या ‘आयात’ उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे. परिणामी भाजपातील नाराजी आता उघड बंडखोरीत रूपांतरित होताना दिसत आहे.
भाजपात दीर्घ काळ कार्यरत असलेले पक्षाचे माजी नगरसेवक दिलीपसिंघ सोडी आणि भानुसिंह रावत यांनी तिकीट नाकारल्यामुळे भाजपाला रामराम ठोकत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. दिलीपसिंग सोडी यांचे त्यांच्या प्रभागात अत्यंत उत्तम पद्धतीने विकासकार्य असून प्रचंड मोठा जनसंपर्क आहे. तसेच या भागात त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. प्रभाग क्रमांक सहामध्ये दलित, वंचित व शोषित समाज घटकांपैकी महत्त्वाचे समजले जाणारे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते क्षितिज जाधव यांच्या पत्नी प्रवेशिका जाधव यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे, काँग्रेसमधून दोन दिवसांपूर्वी भाजपात आलेल्या माजी महापौर शीला किशोर भवरे यांना मात्र तात्काळ उमेदवारी देण्यात आल्याने नाराजी अधिकच वाढली आहे.
हे देखील वाचा : आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही? दिल्ली सरकारने केले ‘हे’ विधेयक मंजूर; नेमका प्रकार काय?
तीव्र असंतोष
याच असंतोषाच्या पार्श्वभूमीवर खासदार अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक महिंद्र पिंपळे आणि दुष्यंत सोनाळे यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतून भाजपात आलेले विनायक सगर यानाही तिकीट नाकारल्याने त्यांनी पुन्हा मूळ पक्षात जाणे पसंत न केले आहे. तसेच भाजपाचे जुने कार्यकर्ते दिलीप ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचा झेंडा उभारला आहे.
भाजपात सध्या निष्ठेपेक्षा आर्थिक ताकद आणि आयात नेतृत्वालाच संधी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. मुलाखतींचा फार्स करून आधीच ठरवलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या अंतर्गत संघर्षांचा फटका भाजपाला निकालातूनच आहे. किती बसतो, याचे उत्तर निवडणूकीच्या निकालातून मिळणार आहे.
हे देखील वाचा : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप
नांदेड शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
नांदेड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, यासंदर्भात पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मनपा निवडणुकीसाठी २० प्रभागांमध्ये एकूण ६०० मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, सुमारे २०० इमारतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतदान प्रक्रिया व कडक बंदोबस्त
मतदारांना मतदानासाठी तीन तासांची वेळ देण्यात येणार आहे, मतदान झाल्यानंतर संबंधितांनी त्वस्ति मतदान केंद्राबाहेर जाण्याचे निर्देश असतील, ३१ डिसेंबर रोजी शहरात विशेष नाकाबंदी व रस्त्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे.
प्रतिबंधात्मक कारवाई
आतापर्यंत एमपीडी अंतर्गत २ कारवाया करण्यात आल्या आहेत, ५०० हून अधिक जणांना हद्दपार करण्यात आले, एकूण ४११ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या असून, मोक्का अंतर्गत ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत (मागील वर्षी ही संख्या १ होती)
संवाद आणि नियोजन
मतदारांना मतदानासाठी तीन तासांची वेळ देण्यात येणार आहे, मतदान झाल्यानंतर संबंधितांनी त्वरित मतदान केंद्राबाहेर जाण्याचे निर्देश असतील, ३१ डिसेंबर रोजी शहरात विशेष नाकाबंदी व रस्त्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे.
उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी ९६ बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.