Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतम अदाणी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त अदाणी कुटुंबाकडून ६०,००० कोटी रुपयांची देणगी

अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांचे वडील श्री. शांतीलाल अदाणी यांची शताब्दीजयंती आणि गौतम अदाणी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त अदानी कुटुंबाने विविध सामाजिक उपक्रमासाठी ६०,००० कोटी रुपयांची देणगी देण्याचे वचन जाहीर केले आहे. अदाणी फाऊंडेशनद्वारे हा निधी प्रशासित केला जाणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 23, 2022 | 06:55 PM
गौतम अदाणी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त अदाणी कुटुंबाकडून ६०,००० कोटी रुपयांची देणगी
Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद : अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांचे वडील श्री. शांतीलाल अदाणी यांची शताब्दीजयंती आणि गौतम अदाणी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त अदानी कुटुंबाने विविध सामाजिक उपक्रमासाठी ६०,००० कोटी रुपयांची देणगी देण्याचे वचन जाहीर केले आहे. अदाणी फाऊंडेशनद्वारे हा निधी प्रशासित केला जाणार आहे.

अदाणी समुहाचे अध्यक्ष श्री गौतम अदाणी याबाबत म्हणाले की, “प्रेरणादायी अशा माझ्या वडिलांच्या १०० व्या जयंतीबरोबरच चालू वर्ष हे माझ्या ६०व्या वाढदिवसाचे वर्षदेखील आहे आणि म्हणूनच माझ्या कुटुंबाने रु. ६०,००० कोटी रक्कम ही आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित अशा धर्मादाय उपक्रमांसाठी – विशेषत: देशाच्या ग्रामीण भागासाठी विनियोग करण्यासाठी जाहीर केली आहे.”

On our father’s 100thbirth anniversary & my 60thbirthday, Adani Family is gratified to commit Rs 60,000 cr in charity towards healthcare, edu & skill-dev across India. Contribution to help build an equitable, future-ready India. @AdaniFoundation pic.twitter.com/7elayv3Cvk

— Gautam Adani (@gautam_adani) June 23, 2022

“मूलभूत स्तरावर, या तिन्ही क्षेत्रांशी संबंधित या उपक्रमाकडे सर्वसमावेषकतेने पाहिले पाहिजे आणि यामार्फतच न्याय्य-समता आणि भविष्यासाठी सज्ज अशा भारतनिर्माणाकरिता एकत्रितरित्या आपण सारथ्य निर्माण करत आहोत. मोठ्या उपक्रमाचे नियोजन आणि त्याच्या अंमलबजावणीचा आमचा अनुभव आणि अदाणी फाऊंडेशनने केलेल्या कार्यातून मिळालेला वस्तूपाठ हे आम्हाला अशा मोहिमेला अनोख्या रितीने गती देण्यास साहाय्यभूत ठरतील. अदाणी कुटुंबाच्या या योगदानामुळे आमच्या ‘ग्रोथ विथ गुडनेस’ या तत्त्वज्ञानाची पूर्तता करण्यासाठी अदाणी फाऊंडेशनच्या आजवरच्या प्रवासात बदल घडवून आणण्याची उत्कट इच्छा असलेल्या काही उज्ज्वल असे मन आकर्षित करण्याचा आमचा मानस आहे”, असेही ते म्हणाले.

[read_also content=”सूरतमध्ये समजावयला गेलेले शिवसेनेचे आमदारच शिंदे गटात सामील… https://www.navarashtra.com/maharashtra/only-shiv-sena-mlas-who-went-to-surat-to-explain-join-shinde-group-nrdm-296205/”]

अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि विप्रो लिमिटेडचे संस्थापक – अध्यक्ष आणि समकालीन एक महान दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे अझीम प्रेमजी या प्रसंगी म्हणाले, “गौतम अदाणी आणि त्यांच्या कुटुंबाची दातृत्वासाठीची बांधिलकी हे, महात्मा गांधी यांच्या संपत्तीच्या विश्वस्ततेचे तत्त्व जगण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, याचे उदाहरण म्हणून स्थापित होऊ शकते. आपण सर्वजण आपल्या व्यवसायाच्या यशाच्या शिखरावर असताना आणि सूर्यास्ताच्या प्रतिक्षेची तमा नसताना हे ध्येय राखणे महत्त्वाचे ठरते.” ते म्हणाले की, “आपल्या देशासमोरील आव्हान आणि संभाव्यता पाहता संपत्ती, प्रदेश, धर्म, जात अशा सर्वांचा बिमोड करून आपण एकत्र काम केले पाहिजे ही आजमितीला काळाची गरज आहे. राष्ट्रीय स्तरावरील अशा महत्त्वाच्या प्रयत्नासाठी मी गौतम अदाणी आणि त्यांच्या फाउंडेशनला शुभेच्छा देतो.”

शाश्वत विकास उद्दिष्टांसह समाजाच्या बदलत्या आवश्यकतेच्या पूर्तीला अदाणी फाऊंडेशनने वर्षानुवर्षे प्रतिसाद दिला आहे. मग ती शाश्वत उपजीविका, आरोग्य आणि पोषण, आणि सर्वांसाठी शिक्षण असो किंवा पर्यावरणविषयक समस्यांना हाताळणे – महिलांच्या सक्षमीकरणावर वाढीव लक्ष केंद्रित करून तळागाळातील अनेक सहयोगांसह कार्य करणे आदी होय. आजमितीला भारतातील १६ राज्यांमधील २,४०९ गावांमधील ३७ लाख सहभागी या उपक्रमामध्ये आहेत.

Web Title: Donation of rs 60000 crore from adani family on the occasion of gautam adanis 60th birthday nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2022 | 06:55 PM

Topics:  

  • Adani News
  • Gautam Adani
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Adani Power चे शेअर्स 5 टक्क्याने वाढले, कंपनी भूतानमध्ये 6,000 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार
1

Adani Power चे शेअर्स 5 टक्क्याने वाढले, कंपनी भूतानमध्ये 6,000 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार

अदानी समूहाची अभूतपूर्व झेप; भूतानमध्ये 570 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी ‘Druk Green Power’सोबत ऐतिहासिक करार
2

अदानी समूहाची अभूतपूर्व झेप; भूतानमध्ये 570 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी ‘Druk Green Power’सोबत ऐतिहासिक करार

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
3

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
4

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.