
Raigad News: सिडकोच्या घरांसाठी अर्ज केला आहे? घरांची लॉटरी कधी निघणार? तारीख जाहीर; अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना
या संदर्भात सिडकोतर्फे स्पष्ट करण्यात येत आहे की, डिसेंबर-२०२५ मधील गृहनिर्माण योजनेत नमूद करण्यात आलेला ‘एलआयजी’ हा शब्द या योजनेच्या प्रयोजनार्थ ‘बिगर-ईडब्ल्यूएस’ या अर्थाने अभिप्रेत असून, यापुढे त्याच अर्थाने त्याचा अन्वयार्थ लावण्यात येईल. योजनेच्या इतर सर्व अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच कायम राहतील आणि लागू राहतील. त्यानुसार, ‘बिगर-इंडब्ल्यूएस सदनिकांसाठीची सोडत दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
योजनेतून माघार घेणे अथवा सदनिकेवरील दावा सोडणे हा पूर्णपणे ऐच्छिक पर्याय आहे. निर्धारित 10 दिवसांच्या मुदतीत हा पर्याय न निवडणाऱ्या अर्जदारांनी जाहीर करण्यात आलेली व्यवस्था मान्य केली आहे, असे गृहीत धरले जाईल आणि त्यांचा सोडतीतील सहभाग कायम राहील. सिडकोने संबंधित सर्व अर्जदारांना या घोषणेची, तसेच अर्ज मागे घेण्यासाठी किंवा सदनिकेवरील दावा सोडण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मुदतीची व प्रक्रियेची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.
ज्या अर्जदारांना या योजनेत सहभागी व्हायचे नाही, त्यांना या घोषणेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १० दिवसाच्या आत आपला अर्ज मागे घेता येईल अथवा सदनिकेयरील आपला दावा सोडता येईल, यासाठी संबंधित अर्जदारांना त्यांच्या अर्जदार लॉगिनमधील ऑनलाइन सुविधेचा वापर करावा लागेल. अर्जदाराच्या लॉगिनमधून ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या विनंत्याच स्वीकारल्या जातील.
अर्ज मागे घेणाऱ्या अथवा सदनिकेवरील दावा सोडणाऱ्या अर्जदारांना सोडतीत सहभागी होता येणार नाही किवा या योजनेअंतर्गत फेरविचाराची मागणीही करता येणार नाही. अशा अर्जदारांनी भरलेली बुकिंग रक्कम कोणतीही कपात न करता पूर्णपणे परत करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची विनंती सादर केल्यापासून पुढील 15 दिवसांच्या आत ही रक्कम परत केली जाईल. तथापि, अर्ज नोंदणीच्या वेळी अर्जदाराने सादर केलेल्या बँक खात्याचा तपशील अचूक व वैच असणे आवश्यक आहे.