Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: झाडांना खिळे ठोकणे, जाहिराती लावणे महागात पडणार! पनवेल महापालिकेकडून दंडाची नवी नियमावली जाहिर

पनवेल महानगरपालिकेने शहरातील झाडांचे संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहिर केला आहे. महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 15, 2026 | 02:51 PM
Raigad News: झाडांना खिळे ठोकणे, जाहिराती लावणे महागात पडणार! पनवेल महापालिकेकडून दंडाची नवी नियमावली जाहिर

Raigad News: झाडांना खिळे ठोकणे, जाहिराती लावणे महागात पडणार! पनवेल महापालिकेकडून दंडाची नवी नियमावली जाहिर

Follow Us
Follow Us:
  • दंडाची टप्याटप्प्याने आकारणी करण्याचा निर्णय
  • नागरिकांनी स्वतःच्या खर्चाने झाडांची छाटणी केल्यास झाडामागे २५० रुपये शुल्क भरावे लागणार
  • दंडाच्या निर्णयाबरोबरच प्रत्यक्ष कारवाईत सातत्य ठेवणेही महत्त्वाचे ठरणार
पनवेल ग्रामीण: शहरातील झाडांचे संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. झाडांच्या खोडाला खिळे ठोकणे, झाडांवर जाहिरातींचे फलक लावणे तसेच झाडांभोवती विद्युत रोषणाई करणे अशा प्रकारांमुळे झाडांचे नुकसान करणाऱ्यांना आता दंडाला सामोरे जावे लागणार आहे. पहिल्या वेळी एक हजार रुपये, दुसऱ्या वेळी तीन हजार रुपये, तर तिसऱ्या वेळी पाच हजार रुपये दंड आकारण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, चौथ्यांदा अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल होणार आहे.

Raigad News: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; १३ दिवस आधीच सुरू झाली रोपवे सेवा

महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरातील झाडांवर विविध राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक जाहिराती लावण्यासाठी खिळे ठोकले जातात. तसेच सण-उत्सवांच्या काळात झाडांच्या खोडाभोवती विद्युत दिव्यांच्या माळा गुंडाळल्या जातात. त्यामुळे झाडांच्या वाढीवर आणि आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दंडाची टप्याटप्प्याने आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी स्वतःच्या खर्चाने झाडांची छाटणी केल्यास झाडामागे २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. महापालिकेमार्फत छाटणी करून घेतल्यास प्रत्येक झाडासाठी १२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

पाच हजार रुपये दंड

या निर्णयानुसार पहिल्या उल्लंघनासाठी प्रत्येक झाडामागे एक हजार रुपये, दुसऱ्या उल्लंघनासाठी ३ हजार रुपये व तिसऱ्या उल्लंघनासाठी पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. चौथ्यांदा नियमभंग झाल्यास संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील कलम २१(१) अंतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असेल.

Raigad News: कर्जतमधील ८४ एकर सरकारी जमिनीचा वाद पेटला! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, संपादन कारवाई केली रद्द

शहराच्या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण आवश्यक

महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील झाडांवर जाहिराती लावणाऱ्या व्यावसायिक संस्था, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजक यांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार, नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कोणाची असेल आणि दंडात्मक कारवाईसाठी स्वतंत्र पथक नेमले जाणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. झाडे ही शहराची नैसर्गिक संपत्ती असून त्यांचे संरक्षण करणे ही केवळ महापालिकेचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे दंडाच्या निर्णयाबरोबरच प्रत्यक्ष कारवाईत सातत्य ठेवणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Panvel municipal corporation announces heavy fines for damaging trees fourth violation will lead to legal action hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Nagpur News : पारडी मेट्रो मार्गाच्या कामाने घेतला वेग; पायाभरणीची कामे पूर्ण; रुळ टाकण्यास सुरुवात, प्रकल्प ७८ टक्के मार्गी
1

Nagpur News : पारडी मेट्रो मार्गाच्या कामाने घेतला वेग; पायाभरणीची कामे पूर्ण; रुळ टाकण्यास सुरुवात, प्रकल्प ७८ टक्के मार्गी

Nagpur News : सीबीआयची धाड; महादेव रॅकेटचे नागपूर कनेक्शन; पॅनल ऑपरेटरच्या घरावर छापा
2

Nagpur News : सीबीआयची धाड; महादेव रॅकेटचे नागपूर कनेक्शन; पॅनल ऑपरेटरच्या घरावर छापा

Chandrapur News: कन्हाळगावच्या जंगलात 32 वाघांचा वावर; अभयारण्य रद्द करण्याच्या मागणीवर सोमवारी महत्त्वाची बैठक
3

Chandrapur News: कन्हाळगावच्या जंगलात 32 वाघांचा वावर; अभयारण्य रद्द करण्याच्या मागणीवर सोमवारी महत्त्वाची बैठक

Child Aadhaar Biometric Update: पालकांनो, ही संधी चुकवू नका! मुलांचे Aadhaar बायोमेट्रिक अपडेट मोफत, अंतिम तारीख काय?
4

Child Aadhaar Biometric Update: पालकांनो, ही संधी चुकवू नका! मुलांचे Aadhaar बायोमेट्रिक अपडेट मोफत, अंतिम तारीख काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.