
राम मंदिरात १०५ वेळा दानचोरी
नवी दिल्ली : राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणाच्या तपासाबाबत एसआयटीने सोमवारी (दि.21) सर्वोच्च न्यायालयात सविस्तर माहिती दिली. सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी एसआयटीच्या स्थिती अहवालाचा हवाला देत सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत देणगी चोरीच्या 105 घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत किती जणांना अटक करण्यात आली असून, संबंधित कोणते पुरावे हाती लागले, याची माहितीही न्यायालयासमोर ठेवण्यात आली.
एसआयटीने सीसीटीव्ही फुटेजसह उपलब्ध विविध सामग्रीचे विश्लेषण केले. तपासादरम्यान देणगी चोरीशी संबंधित कोणते पुरावे हाती लागले, याची माहितीही न्यायालयासमोर ठेवण्यात आली. एसआयटीने सीसीटीव्ही फुटेजसह उपलब्ध विविध सामग्रीचे विश्लेषण केले आहे. त्यातून चोरीच्या १०५ घटना आढळल्याचे स्थिती अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य उपलब्ध सामग्रीचा तपास करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीकडून सादर करण्यात आलेला स्थिती अहवाल वाचून तपासाशी संबंधित माहिती आपल्या नोंदीत घेतली.
सीसीटीव्ही फुटेजपासून साक्षीदारांच्या जबाबांपर्यंत…
तपासात केवळ सीसीटीव्ही फुटेजच नव्हे, तर साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुराव्यांचाही समावेश करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य सामग्रीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेची माहितीही न्यायालयासमोर ठेवण्यात आली.
एसबीआय लॉकरचाही उल्लेख
एसआयटीच्या अहवालानुसार, मौल्यवान वस्तूंच्या पावत्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार केल्या जातात. त्यानंतर या पावत्या एसबीआयच्या लॉकरमध्ये ठेवण्यात येतात. तपासादरम्यान या व्यवस्थेशी संबंधित माहितीही न्यायालयासमोर सादर करण्यात आली.
CEO पदी निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती
राम मंदिर ट्रस्टच्या नवीन सीईओंची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची राम मंदिर ट्रस्टच्या नवीन सीईओं पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी पश्चिम कमांडचे नेतृत्व केले होते. महेश भागचंदका, मदन मोहन पांडे आणि निर्मला यादव या तीन नवीन विश्वस्तांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.