Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाबाबत काहीही बोलू नका; भाजपकडून बृजभूषण सिंहला आदेश

विनेश आणि बजरंग यांनी कुस्तीमध्ये नाव कमावले आणि त्यांच्या खेळाच्या पराक्रमामुळे प्रसिद्ध झाले. पण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे नाव पुसले जाईल.गेल्या वर्षी ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात अनेक तरुण ज्युनियर कुस्तीपटूंचा छळ केल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात आंदोलन केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 08, 2024 | 04:50 PM
विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाबाबत काहीही बोलू नका; भाजपकडून बृजभूषण सिंहला आदेश
Follow Us
Close
Follow Us:

हरियाणा : विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापले असून हरियाणात राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच कुस्तीपटु विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणाच्या मैदानात शडड्डू ठोकल्यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार झाली आहे. अशातच भाजपच्या वरिष्ठांनी भारतीय कुस्ती महासंघ (WFI) च्या माजी प्रमुख आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना काही  महत्त्वाच्या सुचना दिल्याची माहिती समोर आली आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया  काँग्रेसमध्ये सामील झाल्याबद्दल  बृजभूषण शरण सिंहानी त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी विनेश आणि बजरंग यांच्यावर कोणतीही टीका न करण्याचा सल्ला आला आहे.

हेदेखील वाचा: Ajit Pawar: “आता बारामतीवासीयांना मी नाही तर,…”; अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय

फोगाट आणि पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

6 सप्टेंबर रोजी, फोगाट आणि पुनिया,  त्यांनी “धमकीला घाबरून मागे हटणार नाही” असे वचन देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात सामील झाल्यानंतर विनेश म्हणाली होती की, भाजपने बृजभूषण सिंह यांना पाठिंबा दिला,पण दिल्लीतील आंदोलनात काँग्रेसने कुस्तीपटूंना साथ दिली.  तर बजरंग पुनिया यानेदेखील विनेशच्या या वक्तव्याला दुजोरा देत कठीण काळात काँग्रेस आमच्या पाठिशी उभी राहिल्याचेस सांगितले. पण कुस्तीपटूंचा विरोध हा भाजपला लक्ष्य करण्यासाठी काँग्रेसचे ‘षडयंत्र’ असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.

ब्रिजभूषण शरण यांनी पुनिया आणि फोगाट यांची खिल्ली उडवली

मीडियाशी बोलताना ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले होते की, विनेश आणि बजरंग यांनी कुस्तीमध्ये नाव कमावले आणि त्यांच्या खेळाच्या पराक्रमामुळे प्रसिद्ध झाले. पण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे नाव पुसले जाईल.गेल्या वर्षी ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात अनेक तरुण ज्युनियर कुस्तीपटूंचा छळ केल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात आंदोलन केले. विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे कुस्तीपटूंच्या आंदोलनाचे नेतृत्तव केले होते.

हेदेखील वाचा: हाहाहा! तरूण रिमोट कंट्रोल कार घेऊन पार्किंगमध्ये अन्…,पुढे जे झाले ते पाहून हसूनहसून लोटपोट

काँग्रेसने फोगाट आणि पुनिया यांच्यावर मोठी जबाबदारी दिली

बृजभूषण सिंह पुढे म्हणाले की, विनेश आणि बजरंग विधानसभा निवडणूक जिंकणार असा विचार करत असतील तर ते चुकीचे आहे. आपण हरियाणातील कोणत्याही विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवू शकतो. पण भाजपचा एक छोटा उमेदवारही  त्यांचा पराभव करू शकतो,”अशी टीकाही बृजभूषण सिंहंनी केली होती. पण त्याच्या एका दिवसानंतच विनेशला काँग्रेसने हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. दरम्यान, बजरंग पुनिया यांची अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून ते निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत.

Web Title: Dont say anything about vinesh phogat and bajrang punia orders from bjp to brijbhushan singh nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 04:49 PM

Topics:  

  • Bajrang Punia
  • brijbhushan singh
  • Vinesh phogat

संबंधित बातम्या

Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह भाजपला सोडचिठ्ठी देणार? अखिलेश यादव यांचं केलं तोंडभरून कौतुक
1

Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह भाजपला सोडचिठ्ठी देणार? अखिलेश यादव यांचं केलं तोंडभरून कौतुक

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
2

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

“राहुल गांधी हे कठपुतली, ते पंतप्रधान कधीच होणार नाही…; बृजभूषण शरण सिंह यांचा जोरदार घणाघात
3

“राहुल गांधी हे कठपुतली, ते पंतप्रधान कधीच होणार नाही…; बृजभूषण शरण सिंह यांचा जोरदार घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.